hami 
मराठवाडा

बारा हजार मजुर ८७८ कामांवर कार्यरत

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत मजुरांच्या हाताला काम मिळावे, त्‍यांचे स्थलांतर थांबावे यासाठी जिल्हाभरात एक महिन्यापासून रोहयोची कामे सुरू केली आहेत. आज अखेर ८७८ कामांवर ११ हजार ९३१ मजूर काम करीत आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळाल्याने जिल्ह्याबाहेर होणारे स्थलांतर रोखण्यास हमी विभागाला यश आले आहे.

मागील तीन वर्षे सततचा दुष्काळ पडला होता. यावर्षी अवकाळी पाऊस पडल्याने कामे उशिराने सुरू झाली. तसे तर नोव्हेंबरमध्ये कामे सुरू होणे अपेक्षित आहेत. अवेळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बीच्या पेरण्याही उशिराने झाल्या आहेत. जमिनीतील ओल कायम होती तर काही चिभडया जमिनीत पाणी शिल्लक होते. त्यामुळे कामे करणे अश्यक्‍य झाली होती. फेब्रुवारी महिना उजाडला असून मजुरांच्या हाताला काम न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्याची भीती संबंधित विभागाला लागली होती.

या कामांचा समावेश
मागील एक महिन्यापासून हमीची कामे सुरू करण्यात आली. यामध्ये सिंचन विहीर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घरकुलाची कामे, सार्वजनिक सिंचन विहिरी, फळबाग लागवड, तुती लागवड आदी कामांचा यात समावेश आहे.

तालुकानिहाय सुरु असलेली कामे
औंढा येथे २६० कामे सुरू असून, चार हजार ४१२ मजूर काम करीत आहेत. वसमत येथे १८६ कामावर १७१४ मजूर, हिंगोली येथे १५१ कामावर २३३५, कळमनुरी तालुक्यात १७५ कामावर १७०४, तसेच सेनगाव तालुक्यात १०६ कामे सुरू असून त्यावर १७६६ मजूर कामे करीत आहेत. असे एकूण जिल्हाभरात ८७८ कामे सुरू असून ११ हजार ९३१ मजूर कामे करीत आहेत.

मजुरांच्या स्थलांतरणास आळा बसणार
मोठ्या प्रमाणात रोजगार हमीची कामे सुरू झाल्याने मजुरांच्या स्थलांतरणास आळा बसणार आहे. मागील वर्षी देखील मजुरांच्या हाताला कामेच मिळाली नसल्याने बहुतांश गावातील मजूर बाहेर जिल्ह्यात ऊसतोड कामासाठी गेल्याने खेडे, तांडे ओस पडल्याचे चित्र होते. मात्र, यंदा हमी विभागाने स्थलांतरणाचे प्रमाण रोखण्यासाठी डिसेंबरच्या अखेरीस कामे सुरू केल्याने मजुरांनाही दिलासा मिळाला आहे. अशीच कामे मे महिन्यापर्यंत चालू राहिल्यास जिल्ह्यातील मजुरांना जिल्ह्यातच कामे करण्यास वाव मिळणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Mhatre: महिला डॉक्टरला मारहाण प्रकरणात मोठी अपडेट! नगरसेवक रमेश म्हात्रेंना अखेर अटक; व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची कारवाई

Maharashtra Politics: शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये जाणार? BJP आणि NCP च्या दोन बड्या नेत्यांमध्ये भेट; नव्या समीकरणांची चर्चा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची टीम आली अन् स्वीट होममध्ये आढळला मृत उंदीर; तात्काळ परवाना रद्द, नागपूरमध्ये नेमकं काय घडलं?

जुई गडकरीने सुरू केलं नवं काम; अभिनयासोबत आता 'या' नव्या प्रवासालाही केली सुरुवात

Latest Marathi News Live Update: वेळ नदीला महापूर, पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाहतूककोंडी

SCROLL FOR NEXT