Twenty thousand rupees for Kanyadan scheme
Twenty thousand rupees for Kanyadan scheme 
मराठवाडा

कन्यादान योजनेत मिळणार 20 हजार रुपये

मधुकर कांबळे

औरंगाबाद : मागास प्रवर्गातील गरीब मुला-मुलींच्या लग्नात आर्थिक मदत व्हावी, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सुरू केलेल्या
कन्यादान योजनेत दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन विवाह करणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मुलींच्या पालकांना 20 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. ही रक्‍कम पूर्वी 10 हजार होती व ती वस्तुरूपाने दिली जायची; मात्र आता मुलीच्या आईच्या नावाने या रकमेचा लग्नसमारंभ पार पडल्यानंतर धनादेश दिला जाणार आहे.

लग्नसोहळ्यातील अनाठायी खर्चापायी कर्जबाजारी होणे व त्यातून वधुपित्याला आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी व विवाहात होणारा अनावश्‍यक खर्च टाळण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या वरील प्रवर्गातील मुलींच्या लग्नासाठी समाजकल्याण विभागाकडून कन्यादान योजना 2003-04 पासून राबविण्यात येत आहे. सुरवातीला सोहळ्यात लग्न करणाऱ्या नवबौद्धांसह अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, धनगर, वंजारींसह भटक्‍या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील वधूंना पूर्वी 6 हजार रुपयांचे मंगळसूत्र व 4 हजार रुपयांचे संसारोपयोगी साहित्य दिले जायचे. त्यात नुकताच बदल करण्यात आला आहे. आता ही आर्थिक मदत 20 हजार रुपये करण्यात आली आहे. पूर्वी वस्तूंच्या रूपात दिली जाणारी मदत आता धनादेशाद्वारे वधूच्या आई किंवा वडिलांच्या नावाने देण्यात येणार आहे.

  • संस्थांची मदतही वाढविली

सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना यापूर्वी प्रतिजोडप्यांसाठी 2 हजार रुपये दिले जायचे. आता ही रक्‍कम 4 हजार
करण्यात आली असून, हा बदल या वर्षापासूनच करण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी 10 जोडप्यांची लग्ने झाली असून त्यांना अनुदान वाटप करण्यात आले आहे, तर या वर्षी एका सामुदायिक विवाह सोहळयाचा प्रस्ताव दाखल झाला असल्याचे जिल्हा समाजकल्याण कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : नरेश म्हस्केंच्या उमेदवारीमुळे भाजप नाराज? पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

SCROLL FOR NEXT