मराठवाडा

दूर्गा महोत्सवात तुंबळ हाणामारी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : सार्वजनीक दूर्गादेवी महोत्सवात मंडपासमोर गुरुवारी (ता. 18) रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात काही जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी काँग्रेसचे व्यंकट मुदीराजसह दोन्ही गटाचे 14 जण अटक केले. न्यायालयासमोर हजर केले असता या सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली.

गोकुळनगर भागातील गोरक्षण हनुमान मंदिरालगत गोमाता सार्वजनिक दुर्गा मंडळाने देवीची स्थापना केली होती. येथील मंडपात गुरूवारी (ता.18) रात्री दांडियाचा कार्यक्रम सुरु होता. दरम्यान, दांडिया खेळणाऱ्या महिला व मुलींची शुटींग लगतच्या छतावरुन काहीजण करत असल्याचे अजय नागनाथ गोपीवार यांच्या निदर्शनास आले. त्यास मज्जाव केला असता यातील आरोपी बंडू सोनटक्के, व्यंकट रामास्वामी मुदीराज, खदीर, राज मुदीराज, शेख बबलू वजिर शेख, करण रमेश वाघमारे यांच्यासह 10 ते 15 जणांनी लाठ्या-काठ्या, खंजर, तलवार आदी हत्यारांसह येवून गोंधळ घालत अजय गोपीवार व त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केली. यात काही जण जखमी झाले. 
याप्रकरणी अजय गोपीवार यांनी तक्रार दिली. 

तसेच व्यंकट रामास्वामी मुदीराज यांनीही तक्रार दिली असून त्यानुसार मुदीराज व त्यांचे मित्र घराच्या छतावर पोल्ट्री फार्मचे काम सुरु असल्याने वर थांबले असता. यातील आरोपी अजय नागनाथ गोपीवार व त्याच्या सोबत असलेल्यांनी बंडू पाटील यांना फोन व व्हीडीओ कॉल केले. फोन न घेतल्याने वारंवार फोन करुन घराच्या छतावरुन खाली बोलावले. खाली येताच यातील आरोपी अजय गोपीवार, रवी गोपीवार, कृष्णा गोपीवार, साई दिनकर पाटील, राहुल उचेलवार, नरेश भारकाला, विठ्ठल गोपीवार यांच्यासह अन्य 10 जणांनी लाठ्या-काठ्या, खंजर, तलवारीचा धाक दाखवत दहशत निर्माण करत मुदीराज व त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केली.

दोन्ही प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी नोंद करुन शिवाजीनगर पोलिसांनी 30 पेक्षा अधिक जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा नोंदवला. यापैकी पोलिस निरीक्षक मच्छींद्र सुरवसे व तपासीक अधिकारी कमल भोसले आणि किशोर कांबळे यांनी दंगलखोर 14 जणांना अटक केली. या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सर्वांची  जामिनावर सुटका केली. दुर्गा विसर्जनापूर्वी झालेल्या या हाणामारीमुळे या या उत्सवाला गालबोट लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT