Dnyaneshwar Mohare and Dnyaneshwar Ware
Dnyaneshwar Mohare and Dnyaneshwar Ware Sakal
मराठवाडा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी दोन तरुणांनी संपविले जीवन

सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री - तालुक्यातील वारेगाव येथील एका २५ वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.२२) सकाळी आठ वाजता घडली.

ज्ञानेश्वर शिवाजी मोहारे वय २५ (रा.वारेगाव ता. फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर) असे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मृत तरुणाच्या खिशात मी मराठा आरक्षणासाठी मी माझ्या जिवाची आहुती देत असल्याची चिठ्ठी आढळून आली आहे. या घटनेची फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, ज्ञानेश्वर सकाळी शेतात गेला. त्याने गट नंबर १८० मधील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. ही घटना काका सुरेश मोहारे यांनी बघितली. त्यांनी गावात माहिती दिली तसेच फुलंब्री ठाण्यास कळविले.

यानंतर पोलिस निरीक्षक रवींद्र निकाळजे पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष डोंगरे , कैलास राठोड आदीने घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरविला. सदर मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आला.

नायब तहसीलदार संजीव राऊत, तलाठी जोनवाल यांनी पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल सुपूर्द केला. आत्महत्याग्रस्तांच्या नातेवाइकांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मृताच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, बहीण असा परिवार आहे.

दरम्यान, "एक मराठा लाख मराठा" मी मराठा आरक्षणासाठी आहुती देत आहे. मनोज जरांगे आपल्या संग, आपल्या पाठीशी. आपला ज्ञानेश्वर मोहारे अशी चिठ्ठी मयत त्याच्या खिशात निघाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चिठ्ठी लिहून उचलले टोकाचे पाऊल

गिरगाव - मुरुंबा (ता. वसमत) येथील ज्ञानेश्वर संभाजी वारे (वय २२) यांनी सोमवारी आत्महत्या केली आहे. ‘शिक्षण पूर्ण होऊनही काहीही फायदा होत नाही. त्यातच मराठा आरक्षण मिळत नाही. यामुळे मी आत्महत्या करीत आहे’, अशा आशयाची चिठ्ठी लिहून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

मंडळ अधिकारी प्रियांका खडसे, वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, बीट जमादार अविनाश राठोड यांनी पंचनामा केला. जमादार राठोड तपास करीत आहेत. वारे यांच्या मागे आई- वडील, बहीण असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT