Court
Court sakal
मराठवाडा

Umarga Crime : पाच महिन्याच्या पोटच्या मुलाचा गळा दाबून खुन; बापाला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

अविनाश काळे

उमरगा - पोटच्या मुलगा 'हृदय'चा गळा दाबून खून केल्याप्रकरणी तालुक्यातील तुरोरी येथील जन्मदात्या पित्याला येथील जिल्हा न्यायाधीश दत्तात्रय अनभुले यांनी गुरुवारी (ता. दोन) जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या बाबतची माहिती अशी की, तुरोरी येथील बालाजी गायकवाड यांचे सुक्षम हिच्याशी दुसरे लग्न झाले होते. पहिली पत्नी कमलला तीन अपत्य आहेत. मात्र दोघांत नेहमी भांडण होत झाल्यामुळे हे दोघे वेगळे रहात होते. बालाजी दुसरी पत्नी सुक्षम हिच्या सोबत रहात होता. बालाजीला सुक्षमपासुन मुलं नको होते. परंतु सुक्षमला मुल हवे होते. या कारणावरून बालाजी सुक्षमला मारहाण करीत असे.

सुक्षमला २०१७ ला मुलगी झाली, पण तिचा तीन ते चार दिवसात आजाराने दवाखान्यात मृत्यू झाला. २०१८ साली दिवाळीच्या सणात सुक्षमला मुलगा झाला, त्याचे नाव 'हृदय' ठेवण्यात आले. 'हृदय' हा सुक्षम हिची बहिण लक्ष्मी हिच्या सोबत राहत असे. बालाजी याने त्याच्या मुलास कधीही जवळ घेतले नाही. बालाजी हा एसटी मध्ये ड्रायव्हर होता.

१० एप्रिल २०१९ रात्रीच्या वेळी एक वाजण्याच्या सुमारास बालाजीने हृदयचा दोन्ही हातांनी गळा दाबत असताना सुक्षमने पाहिले. तिने बालाजी याला जोराने ढकलले. सुक्षम व लक्ष्मी (बहिण-जाऊ) या दोघींनी हृदयला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा तेंव्हाच मृत्यु झाला होता. बालाजीला मुलाचा गळा दाबण्याचे कारण विचारले असता, माझा मुलगा आहे मी काहीही करीन असे उत्तर दिले.

या घटनेची माहिती सुक्षमने वडील राम कांबळे (रा. येळनूर, ता. निलंगा) यांना सांगितली. या प्रकरणी १२ एफ्रिल २०१९ रोजी सुक्षमने आरोपी पती बालाजी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मंजुषा सानप यांनी चौकशी करून आरोपी बालाजी यांच्या विरोधात कलम ३०२,४९८ अ,३२३,५०४ भादंवी प्रमाणे दोषारोप दाखल केले.

या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले त्यातील अभिजित जाधव, सुक्षम गायकवाड, डॉ. कोटेचा, राम कांबळे यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सहाय्यक सरकारी अभियोक्ता अँड. संदीप देशपांडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश श्री. अनभुले यांनी आरोपी बालाजी गायकवाड यांस दोषी धरून जन्मठेप व पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT