Marathi Sahitya Sammelan News, Latur
Marathi Sahitya Sammelan News, Latur  
मराठवाडा

साहित्य संमेलनाच्या परंपरेत पडणार खंड ; कोरोनामुळे ना बैठक, ना स्थळ निवड

सुशांत सांगवे

लातूर : मराठी भाषा, साहित्याचा महत्त्वाचा सोहळा असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे अडचणीत सापडले आहे. कोरोना पूर्णपणे आटोक्यात आला, जनजीवन पूर्वपदावर आले आणि लोकांमधील कोरोनाची भीती नाहीशी झाली तर आणि तरच संमेलन घेण्याबाबत हालचाली करू, अन्यथा आगामी संमेलन घ्यायचे नाही, असा महत्वपूर्ण निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे. दरम्यान, ऑनलाईन साहित्य संमेलनाचा पर्याय काहींनी समोर आणला आहे. पण, त्याला महामंडळाने नकार दर्शवल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक समारंभ, सोहळे रद्द करण्याची वेळ आली आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून पुढील सहा महिन्यांनी होणाऱ्या सोहळ्यांबाबतही आताच महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. अशा प्रकारचा निर्णय साहित्य महामंडळाने आपल्या आगामी साहित्य संमेलनाबाबत घेतला आहे. त्यामुळेच आगामी संमेलनाचे स्थळ ठरविण्यासाठी समिती नेमण्यात आली नाही. म्हणूनच आगामी संमेलनाचे स्थळही अद्याप जाहीर होऊ शकले नाही. दरवर्षी ते मे-जूनमध्ये जाहीर केले जाते.


साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे साहित्य महामंडळाची नियोजित बैठक होऊ शकली नाही. या बैठकीत आगामी साहित्य संमेलनाचे स्थळ निवडण्यासाठी समिती नेमली जाणार होती. ती आम्ही नेमु शकलो नाही. दिल्ली, नाशिक, अंमळनेर येथून आगामी संमेलनासाठी निमंत्रण आले होते. या स्थळांची पाहणी करू शकलो नाही. इच्छा असूनही संमेलनाची पूर्वतयारी सध्या करता येत नाही, अशी सध्याची स्थिती आहे. कोरोनाची लस तयार होणे आणि ती सर्वांपर्यंत पोचणे महत्त्वाचे आहे. त्यानंतरच आपल्याला संमेलनाबाबतच्या हालचाली करता येतील.


कोरोना आटोक्यात आला नसल्याने टाळेबंदी सतत वाढवली जात आहे. कोरोना कधी संपेल, हे कोणालाही सांगता येत नाही, अशी सध्याची स्थिती आहे. अशा वातावरणात साहित्य संमेलन घेणे अवघड आहे. त्यामुळे साहित्य महामंडळ आणि ठाले-पाटील यांनी पुढील संमेलनाच्या आयोजनाबाबत व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत आहे.
- फादर फ्रान्सिस दिब्रिटो, संमेलनाध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी तीन आरोपींना पोलीस कोठडी तर एकाला न्यायालयीन कोठडी

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT