file photo
file photo 
मराठवाडा

काका- पुतण्याचा बुडून मृत्यू 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : पोहण्यासाठी गेलेल्या काका- पुतण्याचा नदीपात्रात बांधलेल्या बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना चाभरा (ता. हदगाव) शिवारात बुधवारी (ता. १५) दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेमुळे चाभरा गावावर शोककळा पसरली आहे. 

चाभरा (ता. हदगाव) येथील विश्‍वनाथ उर्फ पींटू नारायण वाघमारे (वय ३५) आणि त्यांचा पुतन्या रुपे मुंजाजी वाघमारे (वय १४) हे दोघे आपल्या गाव शिवारातून वाहणाऱ्या एका छोट्या नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले होते. दोघे चुलते पुतणे नदी पात्रातील बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरले. अगोदर पोहत- पोहत ते बंधाऱ्याच्या मध्यभागी गेले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने ते दोघेही बुडायला लागले. एकमेकांना धरुन बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे या दोघांनाही पोहता येत नव्हते. 

काका- पुतन्याचा बुडून मृत्यू झाला

भरदुपारी ही घटना घडल्यामुळे आजूबाजूला त्यांना वाचविण्यासाठी कोणीच नव्हते. त्यांच्या सोबत आलेला एक लहान बालक घरी धावत गेला व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर अनेकांनी या बंधाऱ्याकडे धाव घेतली तोपर्यंत काका- पुतन्याचा बुडून मृत्यू झाला होता. या दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगत होते. ही महिती काही सुजान नागरिकांनी मनाठा पोलिसांना दिली. लॉकडाऊनचा बंदोबस्त असतानाही तातडीने सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंडे यांच्यासह बीट जमादार श्री. कांबळे आणि तिडके हे घटनास्थळी दाखल झाले. 

रात्री उशिरा या दोघांच्या पार्थीवार अंत्यसंस्कार करण्यात आले

पोलिसांनी दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पंचनामा केला. दोन्ही मृतदेहावर निमगाव (ता. हदगाव) येथील प्राथमीक रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृत्तदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले. रात्री उशिरा या दोघांच्या पार्थीवार अंत्यसंस्कार करण्यात आलल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. मुंडे यांनी सांगितले. बुधवारी रात्री उशिरा गजानन किशन वाघमारे (वय ४५) यांच्या माहितीवरुन मनाठा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक श्री. तिडके करत आहेत.  

पोलिसांची तत्परता, गावकरीही धावले

काका- पुतण्याचा बंधाऱ्यात बुडत असल्याचे एका लहान मुलाने त्यांच्या घरी जावू कळविले. त्यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेतली. त्यानंतर लगेच मनाठा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सर्वप्रथम मृत्तकाच्या नातेवाईकांनी शवविच्छेदन करु देण्यास विरोध केला. मात्र सहाय्यक पोलिस निरीक्षक राजंद्रे मुंडे यांनी त्यांना समजावू सांगून अखेर शवविच्छेदन करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT