school children 
मराठवाडा

RTE Act अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेशाची प्रक्रिया सुरू

अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद): शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत तालुक्यातील नोंदणीकृत असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या २० तर मराठी माध्यमाच्या तीन अशा २३ विना अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली वर्गासाठीच्या १०७ प्रवेशाच्या जागा प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया तीन मार्चपासुन सुरू होणार असल्याने पालकांना पाल्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक त्या कागदपत्राची जमवाजमव करावी लागणार आहे.

प्रवेशासाठी वंचित गटातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा (अ), भटक्या जमाती (ब),भटक्या जमाती (क),भटक्या जमाती (ड), इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विशेष मागासप्रवर्ग (एसबीसी), दिव्यांग बालके, एचआयव्ही प्रभावित बालके यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सर्व मागासवर्गीय प्रवर्गातील बालकांच्या प्रवेशासाठी पालकांना उत्पन्न दाखल्याची आवश्यकता असणार नाही. मात्र जातीचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तसेच दिव्यांग व एचआयव्ही बाधित प्रभावित बालकांना जिल्हा शल्यचिकित्सक व सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

तसेच आर्थिक दुर्बल घटकातील खुल्या प्रवर्गातील बालकांच्या पालकांचे उत्पन्न एक लाखाच्या आत असल्याचे २०२०-२१ या वर्षासाठीचा सक्षम अधिकाऱ्यांचा उत्पन्न दाखला प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. प्रवेशासाठी जन्माचे प्रमाणपत्र, वास्तव्याचा पुरावा, उत्पन्नचा दाखला (आर्थिक दुर्बल घटकांसाठी), भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांना दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनामा, वंचित घटकांसाठी पालकांचा, बालकांचा जातीचा दाखला दिव्यांग प्रमाणपत्र ( ४१टक्के पेक्षा जास्त), एक लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला. घटस्फोटित महिलेसाठी  न्यायालयाचा निर्णय, आई व बालकांचा रहिवाशी पुरावा, वडिलांचे जात प्रमाणपत्र, आईचा उत्पन्न दाखला. विधवा महिलांसाठी पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, वडिलांचे जात प्रमाणपत्र, उत्पन्नचा दाखला. अनाथ बालकांसाठी अनाथालयाची कागदपत्रे, जे पालक सांभाळ करतात, त्याचे हमीपत्र. दिव्यांग बालकांसाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र ४१ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असणे बंधनकारक आहे.

शाळा निहाय राखीव जागांची स्थिती-
सरस्वती इंग्लिश स्कूल आलूर (सहा), छत्रपती शिवाजी इंग्लिश स्कूल बलसूर (एक), समृध्दी इंग्शिल स्कूल चिंचोली भुयार (तीन), शायनिंग स्टार इंग्लिश स्कूल दाळिंब (सात), संजीवनी मॉडर्न इंग्शिल स्कूल एकोंडी जहागीर (शुन्य),
डॉ.एचबीके इंग्लिश स्कूल उमरगा  (दोन), फिनिक्स इंग्लिश स्कूल गुंजोटी (एक), सेवाग्राम इंग्लिश स्कूल कवठा (सात), इंदिरा इंग्लिश स्कूल कुन्हाळी (तीन) प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल मुरुम (दोन), न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल तुरोरी (दोन), रायझिंग सन इंग्लिश स्कूल उमरगा (शुन्य), श्री.श्री. रविशंकर मराठी प्राथमिक शाळा उमरगा (१३), शरणप्पा मलंग मराठी शाळा उमरगा (चार), डॉ. के. डी. शेंडगे इंग्लिश स्कूल उमरगा (१४), बाल विकास मराठी प्राथमिक उमरगा (सहा), माऊली इंटरनॅशनल स्कूल उमरगा (एक), श्री श्री रविशंकर इंग्लिश स्कूल, उमरगा (चार), ओरियन इंग्लिश स्कूल, उमरगा (सहा), डॉ. कुशाबा धोंडिबा शेंडगे सीबीएसई स्कूल उमरगा (एक), हरिलाल इंग्लिश स्कूल, उमरगा (शून्य), लोटस पोद्दार इंग्लिश स्कूल, उमरगा (११), हायटेक इंग्लिश स्कूल, येणेगुर (१३).

 " आरटीई कायद्यानुसार पहिल्याच्या वर्गात प्रवेश घेण्याची संधी आहे. शासनाच्या http: //student.maharashtra.gov.in  या वेबसाईटमध्ये होमपेज डाव्या बाजूस आलेले RTE Portal ला क्लिक करून त्यापुढील येणाऱ्या स्क्रीनवरती Online Application या ऑप्शनमधून पालकांनी इयत्ता बालकांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन करावेत. पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर आठवीपर्यंत मोफत प्रवेश राहिल त्याचा पालकांनी लाभ घ्यावा. - शिवकुमार बिराजदार, गट शिक्षणाधिकारी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT