Unseasonal Rain Affects Crushing Season
Unseasonal Rain Affects Crushing Season  
मराठवाडा

राज्यात सत्ता स्थापनेनंतरच पेटणार कारखान्यांचे बॉयलर

प्रकाश बनकर

औरंगाबाद : परतीच्या पावसामुळे ऊसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याचा थेट परिणाम साखर उत्पादनावर होणार आहे. तसेच राज्यात सरकार स्थापनेला उशीर झाल्यामुळे गाळप परवाने मिळालेले नाहीत व अवकाळी पावसामुळे ऊस काढणीला विलंब होणार आहे. या दोन्ही कारणामुळे यंदा साखर कारखाने डिसेंबरमध्येच सुरू होणार आहेत.

 
गेल्या वर्षी राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी स्थिती होती. यावर्षी मान्सून उशीराने सुरू झाला, त्यामुळे बागायती क्षेत्रावर परिणाम झाला होता. यात प्रामुख्याने ऊस क्षेत्रात मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी राज्यात 951 लाख टन उसाच्या गाळपातून 107 टन साखरेचे उत्पादन झाले होते. यावर्षी यात 300 टनाची घट होणार आहे. औरंगाबाद विभागात यंदाच्या गाळप हंगामासाठी 84 हजार हेक्‍टर ऊस लागवड झाली होती. उशीराने झालेला पाऊस व अवकाळी पावसाने ऊसाला दुहेरी फटका बसणार आहे. 


राज्यातील 164 साखर कारखान्यांनी गाळप हंगामासाठी साखर आयुक्तांकडे परवान्यासाठी अर्ज केला आहे. मात्र, राज्यात सत्ता स्थापनेला उशीर झाल्यामुळे कारखान्यांना अद्यापही गाळप परवाना मिळालेला नाही. सत्ता स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होऊन किती कारखान्यांना परवाने मिळतील हे स्पष्ट होईल. तसेच अवकाळी पावसाने ऊस काढणीला उशीर लक्षात घेता डिसेंबरनंतर आता साखर कारखाने सुरू होतील, अशी माहिती सुत्रांनी दिली. 


कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडणार 
ऊस उत्पादन घटल्यामुळे अनेक कारखाने बंद राहण्याची शक्‍यता आहे. जे कारखाने सुरू होतील त्यातील अनेकांना पूर्ण हंगामही घेता येणार नाही. त्यामुळे अनेक साखर कारखान्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही ऊसाचे पैसे देण्यास अडचण होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT