file photo 
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची रिमझिम

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात मागच्या दोन दिवसापासून वातावरणात बदल झाला असुन गुरुवारी ता. १८ सकाळी कळमनुरी व वसमत तालुक्यातील काही गावात मेघगर्जनेसह पावसाची रिमझिम झाली हिंगोली शहरात देखील मेघगर्जना झाली त्यानंतर ढगाळ वातावरण होते. 

जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. हवामान खात्याने बुधवार व गुरुवार या दोन दिवसात पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्याप्रमाणे जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी सकाळी मेघगर्जनेसह पाऊस झाला. यात वसमत शहरासह गिरगाव, सोमठाणा, पार्डी, आदी  गावात पावसाची रिमझिम झाली तसेच कळमनुरी तालुक्यातील बोल्डा, असोला, येहळेगाव, म्हैसगव्हाण आदी ठिकाणी अवकाळी पावसाची रिमझिम झाली. यामुळे गहु, हरभरा पिकांना फटका बसणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

यावर्षी नेमकी पिके काढणीस येतांना अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. सोयाबीन, तुर या पिकाच्या काढणीसाठी अडथळा आला आता रब्बीच्या पिकात हरभरा पिक काढणीस आले आहे.  अवकाळी पावसाचा फटका या पिकांना बसणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.  दरम्यान, जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दोन दिवसापासून दुपारी वातावरणात उष्णता होती. बुधवारपासून सकाळ, सायंकाळी वातावरणात गारवा राहत आहे.   सोयाबीन, तुर पिकांचे झालेले नुकसान रब्बीच्या पिकांत भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती.  मात्र निसर्ग साथ देत नसल्याने त्याचा पिकांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.  जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा गहू, हरभरा या पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होईल असे शेतकरी सांगत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

Women Farmers Lead: भिवधानोरा गावातील शेतकरी महिलांची जलसंधारण, सेंद्रिय शेती व सामूहिक खरेदीत आदर्श कामगिरी; पाणी फाउंडेशन स्पर्धेत उठून दिसले योगदान

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

School Flooding: पहिल्याच पावसात अगरकानडगाव जि.प. शाळा जलमय; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी शिरसाट यांची पाहणी

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

SCROLL FOR NEXT