

Vaibav Sooryavanshi
Sakal
England vs India 2nd T20I, Playing XI : भारत आणि इंग्लंड संघात टी२० मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (४ जुलै) मँचेस्टरमध्ये खेळवला जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे सध्या मालिका ०-० अशी बरोबरीत आहे. आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्याची संधी दोन्ही संघांकडे आहे.
भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होत असला, तरी स्थानिक वेळेनुसार दुपारी २.३० ला हा सामना सुरू होणार आहे. त्यामुळे हा सामना उजेडात खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.