मराठवाडा

Unseasonal Rains: घरावरील पत्रे उडाले, झाडं पडली ; भोकरदनला अवकाळी पावसाने झोडपले, फळबागांचे नुकसान

विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची तीव्रता अधिक असल्याने अनेक ठिकाणच्या घरावरील टिन पत्रे उडाली तर वाऱ्यामुळे मोठमोठाली झाडे उन्मळून पडली.

सकाळ डिजिटल टीम

Jalna Bhokardan Unseasonal Rain: शहरासह तालक्यात (ता.२६) रविवारी रात्री व सोमावरी पहाटे तीन वाजल्यापासून विजांचा कडकडाटासह वादळी वारे व अवकाळी पाऊस झाला. विशेष म्हणजे शहर परिसरातील काही भागाला या अवकाळी पावसाने रात्री तीन ते साडेतीन तास झोडपून काढले.

कोरड्या दुष्काळाची झळा सोसणाऱ्या भोकरदन तालुक्यातील पारध, पिंपळगाव रेणुकाई, आन्वा, सिपोरा बाजार, बोरगाव जहाँगीर, विरेगाव, फत्तेपूर, नांजा, ईब्राहिमपूर, दानापुर, भायडी, केदारखेडा, राजूर, हसनाबाद, मासनपुर, कुंभारी, सोयगाव देवी आदी भागात काही भागाला रविवारी रात्री अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले.

यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची तीव्रता अधिक असल्याने अनेक ठिकाणच्या घरावरील टिन पत्रे उडाली तर वाऱ्यामुळे मोठमोठाली झाडे उन्मळून पडली. शिवाय खरिपातील कापूस, मका तर रब्बीच्या गहू, हरभऱ्याचे नुकसान झाले.

तसेच अनेक ठिकाणच्या द्राक्ष, सीताफळ, पेरू आदी फळबागा या अवकाळीने बाधित झाल्या असून, आधीच दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांचे या अवकाळीने नुकसान झाले आहे. शहरतील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले होते. याशिवाय पावसाचा जोर अधिक असलेल्या ठिकाणच्या शेतजमिनीत पावसाचे पाणी साचल्याचे दिसून आले.

तालुक्यातील बहुतांश भागात हा अवकाळी पाऊस झाला असून, या पावसाने अद्याप कुठलीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती असून, अधिक माहिती घेण्यात येत असल्याचे तहसीलदार संतोष बनकर यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : हिंजवडी आयटी पार्कमध्ये वाहतूक कोंडी

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

जेवढी ताकद लावायची आहे लावा साहेब... मराठी मुद्द्यावरून मनसेच्या विरोधात उतरला हिंदुस्तानी भाऊ? म्हणाला, 'ते लोक पैसे... '

SCROLL FOR NEXT