bank coustmor.jpg 
मराठवाडा

बॅंकेत गर्दी टाळण्यासाठी करावा ग्राहक सेवा केंद्राचा वापर

सकाळवृत्तसेवा

नांदेड : आर्थिक वर्षाचा शेवट, ‘पीएमएफबीवाय’चे दोन हजार व महिलांसाठी पाचशे रुपये ग्राहकांच्या खात्यावर जमा होणार आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या अनुषंगाने बँकेतील गर्दी कमी करून ग्राहकांनी बँक ग्राहक सेवा केंद्राचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश पठारे यांनी केले आहे.

गैरसोय टाळण्यासाठी ग्राहक सेवा केंद्र
कोव्हिड - १९ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कलम १४४ लागू असल्याने जीवनावश्यक सेवा चालू राहण्यासाठी मुभा दिली आहे. यात ग्राहक सेवा केंद्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. ग्राहक सेवा केंद्रांमार्फत दहा हजार रुपये काढणे व २० हजार रुपये भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ग्राहक सेवा केंद्रांचा वापर केल्यास गैरसोय होणार नाही.

लाभार्थींची यादी प्रसिद्ध करावी
ग्राहक सेवा केंद्रांनी बँक सेवा देताना शासनाच्या निर्देशाचे योग्य पालन करावे. बँकांनी सीएसपी यांना योग्य ओळखपत्रे तसेच स्टिकर्स द्यावित. बँकांनी लाभार्थींना पैसे वाटप करण्यासाठी स्थानिक संस्था, लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे. लाभार्थींची यादी गावानुसार प्रसिद्ध करून योग्य लाभार्थींची ओळख पटवून त्यांना सेवेचा लाभ द्यावा. बॅंक ऑफ बडोदाने ग्राहक सेवा केंद्रासाठी दोन हजार रुपये वितरीत केले. जेणेकरून ग्राहक सेवा केंद्र परिसर स्वच्छ करून शासनाच्या आदेशाचे पालन होईल.

प्रोत्साहनपर शंभर रुपये देण्यात येणार
ग्राहक सेवा केंद्र चालू राहण्यासाठी प्रोत्साहनपर शंभर रुपये प्रतिदिन देण्यात येणार आहेत. या प्रमाणे इतर बँकांनी ग्राहक सेवा केंद्रांना स्वच्छता व सेवेसाठी योग्य ती तरतूद करून ग्राहकांची हेळसांड होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापन गणेश पठारे यांनी केले आहे.

बॅंकांच्या वेळेत बदल
कोव्हिड - १९ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कलम १४४ लागू असल्याने जीवनावश्यक सेवा चालू राहण्यासाठी मुभा दिली आहे. बॅंकामध्ये ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील बॅंकांनी त्यांच्या वेळेत बदल केला आहे. सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत ग्राहकांना आपल्या व्यवहारासाठी बॅंकात येता येइल. ग्राहकांनी शक्यतो ऑनलाइन व्यवहार करावा, अशा सुचना बॅंकाकडून देण्यात येत आहेत. बॅंकेकडून कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरविण्यात येवून एकावेळी एकाच ग्राहकाला बॅंकेत प्रवेश दिला जात आहे. प्रवेशापूर्वी त्यांना हात धूण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: साखर झोपेत असताना भयंकर घडलं! ठाण्यात २५ वर्षे जुन्या सदनिकेचा काही भाग कोसळून दुर्घटना; २ जखमी

Pune Crop Insurance: पुणे जिल्ह्यात सुमारे ८३,००० शेतकऱ्यांनी काढला पीक विमा; २३८ कोटी रुपयांचे मिळणार पीक विमा सुरक्षा कवच

‘मला वाटलं मी मरणारच…’ कॅन्सरच्या निदानानंतरची ती भयानक रात्र सांगताना मनीषा कोईराला भावुक, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : चाकणमध्ये ५ ते ७ किमी वाहनांच्या लांबच लांब रांगा! खड्ड्यांमुळे चाकण महामार्गावर अपघात; २ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर

पुण्यातील बुधवार पेठेत सपना बिल्डिंगमध्ये पोलिसांचा छापा... समोर जे दिसलं ते धक्कादायक, २ जणांना अटक

SCROLL FOR NEXT