संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र. 
मराठवाडा

ढेरी सांभाळत गुन्हे रोखताना दमछाक

उमेश वाघमारे

जालना -  नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्र कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिसांचे आरोग्यच असुरक्षित झाले आहे. पोलिस भरती वेळी शारीरिक चाचणीवर भर देणारा गृह विभाग नंतर मात्र त्यांच्या फिटनेस्‌कडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ढेरी पुढे आलेले, अनफिट, आजारांनी त्रस्त असलेल्या पोलिसांची संख्या वाढतच चालली आहे. गृह विभागाने पोलिसांचे आरोग्य व तंदुरुस्तीबाबत लक्ष देण्याची गरज आहे. 

पोलिसांची नोकरी म्हणजे धावपळ. त्यामुळे ऊन, वारा, पावसातही दंगा, निवडणुका, व्हीआयपी बंदोबस्त, सणांच्या बंदोबस्तासाठी पोलिस सतत रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात असतात. या बंदोबस्तासह रात्रीची गस्त, चोरटे, दरोडेखोरांचा पाठलाग करण्याची वेळही पोलिसांवर येते. मात्र, कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पोलिसांच्या खाण्यापिण्याचा ठराविक वेळच नसतो. परिणामी त्यांचे स्वतःच्या शरिराकडे दुर्लक्ष होते. पोलिस भरतीच्या वेळी मात्र शारीरिक चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच पोलिस सेवेत घेण्यात येते. परंतु, सेवेत रुजू झाल्यानंतर गृह विभागाकडून पोलिसांच्या फिटनेस्‌कडे दुर्लक्ष केले जात आहे. आज रोजी अनेक पोलिसांचे शरीर स्थूल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे चोरटे, दरोडेखोरांचा पाठलाग करताना अनेकांची दमछाक होते. परिणामी पाठलाग करूनही चोरटे पोलिसांच्या हातून निसटतात. तसेच, लठ्ठपणामुळे व अतिरिक्त ताणतणावामुळे शारीरिक आजार जडतात, अनेकदा हृदयरोगाचा धक्का, रक्‍तदाब कमी-जास्त, मधुमेह, भोवळ येणे, मानसिक तणाव असे प्रकार घडतात. या बाबी टाळण्यासाठी गृह विभागाने पोलिस भरतीनंतरही पोलिसांच्या शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

शुगर, बीपीचा नाही लेखाजोखा 
अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना वयोमानानुसार शुगर, बीपीचा त्रास होतो. मात्र, पोलिस प्रशासनाकडे जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी, अधिकारी यांना शुगर, बीपीचा त्रास आहे का, याची देखील माहिती नाही. पोलिसांचे हेल्थकार्ड गरजेचे आहे. मात्र, तसे दिसत नाही. यावरूनच पोलिस प्रशासन पोलिसांसह गृह विभाग पोलिसांच्या आरोग्याची किती काळजी घेत आहे, हे दिसून येते. 

वर्षातून एकदा आरोग्य तपासणी 
पोलिस कल्याण निधीच्या माध्यमातून पोलिस कल्याण सप्ताहादरम्यान पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात येते. अर्थात वर्षातून एकदा होणारी ही तपासणी केवळ औपचारिकता ठरत आहे. पोलिसांना संतुलित आहार, नित्य करावयाच्या कसरती, मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्याबाबतचे मार्गदर्शन मिळणेही गरजेचे आहे. 

पोलिस ठाण्यातील ग्राऊंडचा प्रश्‍न 
पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यस्त वेळेतून वेळ काढत शारीरिक कसरत व्हावी यासाठी पोलिस ठाण्याच्या आवारत ग्राऊंड असणे अपेक्षित आहे. या ठिकाणी हॉलीबॉलसारखे शारीरिक खेळ खेळणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक पोलिस ठाण्यांची अवस्था बिकट असल्याने ग्राऊंडचा तर प्रश्‍नच येत नाही. 

परेडमध्येच होतो व्यायाम 
पोलिस कवायत मैदान येथे पोलिसांकडून परेड घेतली जाते. याच परेडदरम्यानच पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचा व्यायाम होतो. त्यामुळे परेडमधील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची शारीरिक ठेवणही उत्तम राहते. अन्यत्र मात्र तसे दिसत नाही. 

व्यायामशाळेची प्रतीक्षा 
पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारामध्ये पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी व्यायामशाळा इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, ही व्यायामशाळा अद्यापही सुरू झालेली नाही. ती सुरू झाल्यानंतर किमान पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी त्याचा लाभ होईल. 

जिल्ह्यातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक समस्यांसंदर्भातील माहिती उपलब्ध नाही. पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण असल्याने ते स्वतःसाठी वेळ देऊन शकत नाहीत. मात्र, पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी स्वतःच्या आरोग्यासाठी एक तास व्यायाम करणे अपेक्षित आहेत. व्यस्त कामातून रोज एक तास वेळ काढणे कठीण नाही. 
-चैतन्य एस., 
पोलिस अधीक्षक, जालना. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT