Nanded News 
मराठवाडा

Video - नांदेडकर अजूनही अनभिज्ञच...कशाबाबत ते वाचाच....

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र व राज्य शासनासह स्थानिक प्रशासन विविध उपाययोजना करत आहेत. देश लॉकडाऊन केला असला तरी जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवली आहेत. विशेष म्हणजे दिवसभर ही दुकाने उघडी राहत असून, नागरिक एकाच वेळी गर्दी करत आहे. त्यामुळे ‘नांदेडकर अजूनही कोरोनाविषयी अनभिज्ञ’च असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशच नाही तर संपूर्ण जग हैराण झालेला आहे. त्यामुळे भारतात या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन केले असून नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरु नये, म्हणून संचारबंदीची घोषणा केली. तरीही नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत आहेत. 

शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी
विशेष म्हणजे जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने बंद आहेत. असे असताना काही हौशी लोक विनाकारण रस्त्यावर गर्दी करत आहेत. परिणामी, पोलिसांना या दीडशहाण्यांना धडा शिकविण्यासाठी बळाचा वापर करावा लागला होता. परंतु, यात पोलिसांची प्रतिमा खराब होत असल्याने बळाचा वापर करणे पोलिसांनी बंद करून ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे.

गल्लीबोळातील गर्दी तशीच
शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सुमारे ६० ठिकाणी बॅरिकेट्‍स टाकून जिल्हा व पोलिस प्रशासनाने रहदारीवर नियंत्रण मिळवले खरे. मात्र, गल्ली बोळांतील गर्दी अद्यापही कमी झालेली नाही. शहराच्या इतवारा, देगलूर नाका. पिरबुऱ्हाणनगर आदी भागांमध्ये अजूनही सकाळी आणि रात्रीच्या वेळी गर्दी पहायला मिळत आहे. काही ठिकाणी मैदानावर तरुण मुले एकत्र येऊन क्रिकेट आणि इतर खेळ खेळताना दिसत आहेत. त्याकडे जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागाने तत्काळ लक्ष देऊन गल्लीबोळातील गर्दी कमी करण्याची नितांत गरज आहे. 

नांदेडकरांनो नियमांचे पालन करा
कोरोनापासून वाचण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाय शासनाने सांगितले असून त्या नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याची गरज आहे. त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. अनेक ठिकाणी नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. त्यामुळे त्याचा धोका होऊ शकतो. विनाकारण घराबाहेर पडू नका. आवश्‍यकता असेल तरच घराबाहेर जा. रस्त्यावर किंवा दुकानात खरेदीसाठी गर्दी करु नका, सोशल डिस्टन पाळा हे व इतर प्रतिबंधात्मक उपाय कटाक्षाने पाळावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: साखर झोपेत असताना भयंकर घडलं! ठाण्यात २५ वर्षे जुन्या सदनिकेचा काही भाग कोसळून दुर्घटना; २ जखमी

Pune Crop Insurance: पुणे जिल्ह्यात सुमारे ८३,००० शेतकऱ्यांनी काढला पीक विमा; २३८ कोटी रुपयांचे मिळणार पीक विमा सुरक्षा कवच

‘मला वाटलं मी मरणारच…’ कॅन्सरच्या निदानानंतरची ती भयानक रात्र सांगताना मनीषा कोईराला भावुक, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : चाकणमध्ये ५ ते ७ किमी वाहनांच्या लांबच लांब रांगा! खड्ड्यांमुळे चाकण महामार्गावर अपघात; २ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर

पुण्यातील बुधवार पेठेत सपना बिल्डिंगमध्ये पोलिसांचा छापा... समोर जे दिसलं ते धक्कादायक, २ जणांना अटक

SCROLL FOR NEXT