मराठवाडा

मध्य प्रदेशातील अख्खे गावच चोरीच्या धंद्यात!

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - एखाद्या गावातील व्यक्तींचा चोरीचाच "उद्योग' असेल तर...! बालपणीच लहानग्यांना चोरीचे धडे दिले जात असतील तर...! हे खरं वाटणार नाही. पण ही बाब पोलिसांच्या चौकशीतून समोर आली आहे. मध्य प्रदेशातील एका गावातच चोरीचे धडे मुलांना दिले जातात. गंभीर म्हणजे, मुले लहान असतानाच मोठी मंडळी चोऱ्या करण्यासाठी त्यांची "डील' करतात. एका बालकासाठी 20 लाखांच्या आसपासही ही "डील' असते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

बीड बायपास भागात एका लग्नसमारंभातून बांधकाम व्यावसायिकाचे 30 तोळे सोन्याचे दागिने चोरी प्रकरणात संशयित चोर मध्य प्रदेशातील असल्याचा उलगडा झाला आहे. तिघांची माहितीही पोलिसांनी मिळवली असून अल्पवयीनांचाच चोरीत सहभाग दिसून आला. यात पोलिस पथक तपास करीत आहे. 

मध्य प्रदेशात काही कुटुंबांचा चोरीचाच धंदा असून त्यांच्या तसेच अन्य काही मुलांना चोरीसाठी तयार केले जाते. अशा बालकांचा लाखो रुपयांत चोरीसाठी व्यवहार केला जातो. ठराविक वर्षे ही मुले ठरल्यानुसार चोरीची कामे करतात. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील कडिया व अन्य दोन-तीन गावांतून अशाच काही टोळ्यांतील अल्पवयीनांना औरंगाबादेतील लग्नसमारंभात दागिने लंपास करण्यासाठी पाठविल्याची बाब समोर आली, अशी माहिती सूत्रांनी दिली. कडिया व अन्य काही गावांबाबत सांगायचे झाल्यास अल्पवयीन मुलेही दारू अड्डे व दुकानांसमोर जुगार खेळताना दिसतात. तसेच गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिस गेल्यास गावच त्यांच्यावर धावून जाते. गावठी पिस्तूलचाही काहीवेळा वापर होतो. प्रसंगी मोठा विरोध, दगडफेक होते आणि पोलिसांनाही तेथून माघार घ्यावी लागते, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. 

चोरीचे धडे 
ज्या वयात पाटी-दप्तर हवे त्याच वयात गैरकामांसाठी व्यवहार झालेल्या मुलांना चोरी कशा पद्धतीने करावी, चोरीनंतर निसटण्याची "कला', लग्नसमारंभात डल्ला मारण्याची पद्धत, पोलिसांच्या हाती लागल्यानंतर चुकीची माहिती कशी द्यावी, याची माहिती शिकवली जाते. 

पकडणेही आव्हानच 
सूत्रांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील त्या गावात एखाद्या प्रकरणात तपासासाठी गेल्यानंतर तिथे आरोपी पकडताना मोठे कसब लागते. एकाला पकडताना अनेकांचा जमाव समोर येतो. त्यांच्याशीही दोन हात करावे लागतात. त्यांना तोंड देणेही अवघड बनते. त्यामुळे विविध वेशांत जाऊन अथवा रात्रीच्या वेळी पकडण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. 

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT