Lieutenant colonel Vinay Garad Khamaswadi Osamanabad News
Lieutenant colonel Vinay Garad Khamaswadi Osamanabad News  
मराठवाडा

सैन्यात लेफ्टनंट होत साकार केले आईवडिलांचे स्वप्न

सुनील पाटील

खामसवाडी (जि. उस्मानाबाद) : गावकुसातल्या विनय गरड या तरुणाची लेफ्पनंट पदी निवड झाली आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण झालेल्या या तरुणाने आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. सात डिसेंबर रोजी आईएमएच्या सैन्य प्रशिक्षणानंतर डेहराडून येथे भारताचे सरंक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्या हस्ते स्वार्ड ऑफ ऑनर व सुवर्णपदकाने विनयला सन्मानित करण्यात आले.

खामसवाडी (जि. उस्मानाबाद) येथील विलास गरड यांचे सुपुत्र विनय गरड यांची सात डिसेंबर रोजी डेहराडून येथे आईएमएच्या सैन्य प्रशिक्षणातील 306 कॅडेटसची पासिंग आऊट परेड झाली. यात महाराष्ट्रातील 19 जणांचा समावेश होता. आईएमए सैन्य प्रशिक्षणानंतर विनय गरड यांची सेनेत लेप्टनंटपदी निवड झाली आहे. डेहराडून येथे भारतीय सेनेत समावेश झालेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात भारताचे सरंक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्या हस्ते स्वार्ड ऑफ ऑनर व सुवर्णपदकाने विनयला सन्मानित करण्यात आले. खामसवाडीच्या या सुपुत्राची अथक परिश्रमाने एवढ्या मोठ्या पदावर निवड झाल्याबद्दल विनय यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लेप्टनंटपदी निवड झालेले विनय गरड यांचे वडील भूम (जि. उस्मानाबाद) येथे प्राध्यापक आहेत. तर आई शिक्षिका आहेत. विनयचे पाचवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण भूम येथील रवींद्र प्राथमिक विद्यामंदिरात झाले असून, बारावीपर्यंतचे शिक्षण सातारा येथील सैनिक शाळेत झाले आहे. पुणे येथे तीन वर्षांचे एनडीएमध्ये शिक्षण झाले आहे. इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ते महाराष्ट्रातून सर्वप्रथम आले होते. एनडीएमध्ये शिक्षण घेत असताना व आई- वडिलांच्या प्रेरणेने त्यांना भारतीय सैन्यदलात जाण्याची ओढ निर्माण झाली. पैरा रेंजिमेटमध्ये ते रुजू झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

SCROLL FOR NEXT