फोटो 
मराठवाडा

वाहतुक नियमाचा भंग, बारा लाखाचा दंड 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : महामार्गावरून चालणाऱ्या वाहनांच्या अनियमिततेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ‘इंटरसेप्टर’ वाहन कार्यरत करण्यात आले आहे. या वाहनाने दोन महिण्यात १२ लाखांचा दंड वाहतुक नियमन तोडणाऱ्या वाहनांवर लावला आहे. त्यापैकी एक लाख रोख रक्कम वसुल केली असुन उर्वरीत रक्कम शासनाच्या तिजोरीत लवकरच जमा होणार आहे. 

नांदेड परिक्षेत्र नांदेडसाठी पाच इंटरसेप्टर वाहन देण्यात आले होते. त्या वाहनात समोरून येणाऱ्या दोन किलोमीटर अंतरावरील वाहनांची हालचाल व त्याच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचे यंत्र लवण्यात आले आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरासुद्धा बसविण्यात आला आहे. या पाच वाहनांपैकी एक वाहन नांदेड पोलिसांच्या वाट्याला आले. त्या वाहनावर सध्या पोलिस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी व त्यांच्या मदतीला चार वाहतुक शाखेचे पोलिस देण्यात आले आहे. या वाहनांचे काम फक्त महामार्गावरील वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवणे आहे. तसेच काही चालक नशेत आपले वाहन चालवित असतील तर त्यांना समज देऊन दंड आकारणे.

पथकावर पोलिस अधीक्षकांची करडी नजर

पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी या वाहनांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्त सुचना देऊन कामात कसुर करू नका. महामार्गावर कार्यरत असतांना पोलिस वाहन दिसले तर वाहन चालक आपला वेग कमी करुन वाहन चालवितात याचा फायदा अपघातासारख्या दुर्घटनांना आळा बसु शकतो. ता. तीन डिसेंबर ते ता. ३० जानेवारी या काळात इंटरसेप्टर वाहनांकडून अनेक वाहनांची कसुन तपासणी करण्यात आली. तसेच ड्रंक ॲन्ड ड्राईव्हवर नियंत्रण मिळविता आले. या वाहनातूल अत्याधुनीक सुविधेमुळे वाहनांची गती त्वरील लक्षात येते. ठरवून दिलेल्या गतीपेक्षा जर ते वाहन कमी अधिक प्रमाणात चालत असले तर या वाहनाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार या पथकाला दिले आहेत.

जिल्ह्यातील विविध मार्गावर तपासणी

जिल्ह्यातील नांदेड - नर्सी, नांदेड - हदगाव, नांदेड- मुदखेड, नांदेड- भोकर, नरसी ते बिलोली,नरसी ते मुखेड, नांदेड ते पूर्णा, नांदेड ते लोहा, नांदेड ते मुदखेड आमि नांदेड ते मालेगाव या रस्त्यावर गस्त घालून अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. तपासण्यात आलेल्या वाहनात बस, ट्रक, टेम्पो आणि दुचाकी यासह तिनचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. नांदेड जिल्ह्यात या प्रकारची तपासणी व दंडात्मक कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT