Wadwani Municipal Council Election 2021 esakal
मराठवाडा

Beed : वडवणीत मतदानाच्या दिवशी राडा, भाजप-राष्ट्रवादीचे उमेदवार भिडले

वडवणी नगरपंचायतीसाठी आज सकाळपासूनच मतदानाला शांततेत सुरुवात झालेली होती.

सकाळ वृत्तसेवा

वडवणी (जि.बीड) : वडवणी नगरपंचायतीसाठी (Wadwani Municipal Council Election 2021) आज मंगळवारी (ता.२१) सकाळपासूनच मतदानाला शांततेत सुरुवात झालेली होती. मात्र वडवणी येथे केंद्र क्रमांक तीनवर मतदानाच्या प्रारंभापासूनच दाेन गटांत सातत्याने वाद सुरु हाेते. त्याचे पर्यावसन हमरीतुमरीवर आले. परिस्थितीचे गांभीर्य पाहून पाेलिसांनी भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. सध्या या मतदान केंद्रावरील तणाव निवळला असून तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. (Wadwani Municipal Council Election BJP NCP Candidates Beaten Eachother Beed Politics)

वडवणी नगरपंचायतच्या १३ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून सकाळपासूनच मतदानाला सुरुवात करण्यात होती. प्रभाग तीन वगळता इतर ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे. सकाळी केंद्र क्रमांक तीनमध्ये राष्ट्रवादी व भाजपच्या उमेदवारांमध्ये राडा झाल्याचे चित्र बघायला मिळाले. मात्र बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे हमरीतुमरीवरच हे प्रकारण शांत झाले. मात्र बघ्यांवर पोलिसांनी लाठचार्ज केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT