file photo 
मराठवाडा

स्वच्छता विभागातील कर्मचारी गणवेशाच्या प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा

परभणी : औषधी फवारणीसह अन्य कामे करणाऱ्या महापालिकेच्या मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांना सुरक्षा गणवेष वाटप करण्यात आला. आता स्वच्छता विभागातील कर्मचारी या गणवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
परभणी महापालिकेच्या वतीने प्रतिबंधक उपाय योजनेत शहराच्या निर्जंतुकीकरण आसह परिसर स्वच्छता व आरोग्य तपासणी आदी महत्त्वाची कामे केली जात आहेत.  आपत्कालीन परिस्थितीमध्ये महापालिकेचे हे सर्व विभाग एकत्रित काम करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मलेरिया विभाग औषध फवारणी, धूर फवारणी करीत असून अग्निशमन दल शहर परिसर निर्जंतुकीकरण याचे काम करीत आहे. तर स्वच्छता विभाग रस्त्यांची साफसफाई नाल्यांची साफसफाई करून परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम चोखपणे बजावत असल्याचे चित्र चित्र आहे. 


 स्वच्छता, फवारणीचे कामे टप्प्याटप्प्याने
महापौर अनिता सोनकांबळे उपमहापौर भगवान वाघमारे आयुक्त रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मलेरिया अधिकारी विनय मोहरीर, अग्नीशामक अधिकारी आर. बी. कानडे, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, विनय ठाकूर, आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांच्या नेतृत्वाखाली शहरात प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवल्या जात आहेत. विभागामार्फत स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्यांना स्वच्छता निरीक्षक मेहराज अहेमद,  रत्नपारखे, नयनरत्न घुगे, शे. शादाब, प्रल्हाद देशमाने, श्रीकांत कुरा हे सहकार्य करीत आहेत. 
प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त अल्केश देशमुख, शिवाजी सरनाईक, मुस्तदीकखान हे आपल्या समिती अंतर्गत कार्याचे नियोजन करीत आहेत. घंटागाडी, परिसर स्वच्छता, फवारणी आदी कामे टप्प्याटप्प्याने केली जात आहेत. दरम्यान, मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच स्वच्छताविभागातील कर्मचारीही जोखीमेचे काम करतात. त्यांनाही गणवेशाची गरज आहे. यासाठी महापालिकेने लवकरात लवकर गणवेश द्यावा, अशी मागणी होत आहे.


घरोघरी जाऊन आरोग्याची माहिती
बील कलेक्टर मार्फत शहरातील कॉलनीत सर्व्हे करण्यात येत असून बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची माहिती संकलित करीत आहेत. शहरातील नागरिकांची तपासणी आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. ताप, सर्दी, खोकला असल्यास जिल्हा रुग्णालयास पाठवले जात आहे. या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत, डॉ. कलीमा बेग, समन्वय गजानन जाधव हे अन्य कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेत आहेत आवश्यकता वाटल्यास त्यांच्या पुढील तपासण्या केल्या जात आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal : अंगावर धावणे महागात पडले, ICCची यशस्वी जैस्वालवर कारवाई! ५ सामन्यांची बंदी की आणखी काही? नेमका काय निर्णय घेतला...

ती गोष्ट घडली आणि लता मंगेशकर यांनी रागात थेट CID च्या निर्मात्यांनाच केलेला फोन केला, इन्स्पेक्टर दयाने सांगितला किस्सा

Nigdi Chakan Metro : भोसरीतील उड्डाणपूल पाडण्यावरून राजकीय मौन; निगडी-चाकण मेट्रो ‘डीपीआर’ला मंजुरीची प्रतीक्षा

Marathi News Live Updates : सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला

Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT