Waluj entrepreneurs took a meeting with the Commissioner of Police
Waluj entrepreneurs took a meeting with the Commissioner of Police 
मराठवाडा

वाळूजच्या उद्योजकांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट

योगेश पायघन

औरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहतीत कंपन्यांची तोडफोड करणाऱ्यांची गय करणार नाही. उद्योजकांनी कंपनीबाहेरील गेटच्या डिझाईनला महत्व देण्यापेक्षा मजबुती व सुरक्षेवर लक्ष केंद्रित करा. यापुढे औद्योगिक वसाहतीत बाहेरील व्यक्तीच्या प्रवाशांवर निर्बंध यावेत. यासाठी उद्योजकांना पोलिस सहकार्य करतील, असे आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी स्पष्ट केले. 

महाराष्ट्र बंददरम्यान गुरुवारी (ता.9) वाळूज परिसरातील कंपन्यांमध्ये समाजकंटकांनी घुसून तोडफोड केली. यासंदर्भात उद्योजकांच्या शिष्टमंडळ शनिवारी (ता 11) पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना भेटले. त्यात मराठा उद्योजकांच्या कंपन्यांचेही नुकसान झाले. मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंध नसलेल्या व हे नुकसान करणाऱ्या समाजकंटकांना कठोर शासन व्हायला पाहिजे. त्यासाठी चौकशीत पोलिसांना पूर्ण सहकार्य करू अशी ग्वाही उद्योजकांच्या शिष्टमंडळाच्या वतीने मानसिंग पवार यांनी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना दिली.

यावेळी सुनील किर्दक, जगन्नाथ काळे, अशोक बेडसे पाटील, बालाजी शिंदे, भारत मोतींगे, अमित राजळे, राहुल घोगरे, कृष्णा गायकवाड, विजयराज शिंदे, कदम, बाबुराव खोडे, सुनील भोसले, विंग कमांडर जाधव, नारायण पवार आदींचा शिष्टमंडळात सहभाग होता.

आयुक्तांचा सल्ला...

-कंपनीच्या सुरक्षेवर भर देण्याचा द्या.
- औद्योगिक वसाहतीत प्रवेशव्दारावरच नियंत्रण गरजेचे
- कंपनीत गेटकीपर पेक्षा तगडे सुरक्षा रक्षक नेमा 
-केवळ सुरक्षारक्षक एजन्सीच्या भरवशावर न राहता लायक व्यक्ती सुरक्षेसाठी निवडा
-प्रॉपर्टी संरक्षणाचा प्रत्येकाला हक्क त्याचा वापर करा
-तपास नव्या पोलीस उपायुक्तांकडे
-औद्योगिक वसाहतींच्या नव्याने सुरक्षा उपयोजना करा
-पोलिसांचे मन्यष्यबळी सुरक्षेला देऊ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT