हिंगोली - रिपब्लिकन सेनेतर्फे घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
हिंगोली - रिपब्लिकन सेनेतर्फे घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.  
मराठवाडा

महाविद्यालयांची दारे उघडण्यासाठी घंटानाद करण्याचा इशारा...कुठे ते वाचा... 

राजेश दारव्हेकर

हिंगोली - राज्यातील प्राथमिक शाळा वगळता उच्च माध्यमिक शाळा, विद्यापीठ, महाविद्यालये रितसर सुरू करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाविद्यालयांची दारे उघडली नाही, तर महाविद्यालयासमोर ता. दहा सप्टेंबरला घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे निवेदन सादर केले. या निवेदनात हा इशारा देण्यात आला आहे. 

ऑनलाइन शिक्षणाचा फार्स 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सहा महिन्यांपासून राज्यात लॉकडाउन सुरू आहे. जूननंतरदेखील कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शाळा, महाविद्यालये बंद असून, केवळ विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा फार्स केला जात आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून अनलॉकची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरवात करण्यात आली असून, व्यापार-उद्योग दळणवळण, खासगी व शासकीय कार्यालयीन कामकाज सुरळीत होऊन पूर्वपदावर येत आहे. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान 
सध्याची कोरोनास्थिती पाहता बाल वयोगटातील पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता प्राथमिक शाळावगळून राज्यातील इतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालये, विद्यापीठ यांना दारे उघडण्यास परवानगी द्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. लॉकडाउनच्या कालावधीत यूजीसी, राज्य सरकार, विद्यापीठे व शिक्षण मंडळे आदींनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना व नियमांनुसार, ऑनलाइन शैक्षणिक कामकाज पार पाडण्याचा प्रयत्न, शैक्षणिक संस्थांमार्फत केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होऊन, तो शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाबाहेर फेकला जाण्याची चिन्हे दिसत आहेत. 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान 
एकीकडे ऑनलाइन अध्यापनाचा आग्रह, तर दुसरीकडे शैक्षणिक संस्थांमधील ऑनलाइन सुविधांची अनुउपलब्धता व ग्रामीण विद्यार्थ्यांची असहाय्यता आदी कारणांमुळे ग्रामीण भागात शिक्षक, प्राध्यापकांचे ऑनलाइन अध्यापनाचे प्रयत्न बऱ्याच अंशी विफल होताना दिसतात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने नियमांच्या अधीन राहून राज्यातील उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ रीतसर सुरू करण्याची मागणी केली आहे. 

आंदोलन करण्याचा इशारा 
सरकारने तत्काळ निर्णय घेतला नाही, तर प्रदेशाध्यक्ष सागर डबराशे यांच्या नेतृत्वाखाली दहा सप्टेंबरला जिल्ह्यातील महाविद्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख किरण घोंगडे यांनी दिला आहे. निवेदनावर युवा जिल्हाप्रमुख विकी काशिदे, शहराध्यक्ष योगेश धबाले, उपाध्यक्ष विनोद जोगदंड, शामराव मोगले, मीडिया तालुकाध्यक्ष यशवंत साळवे, आशिष मुळे, अमोल काशिदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.  

संपादन - अभय कुळकजाईकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT