jalana 
मराठवाडा

दुष्काळाच्या गडद छायेत परतूर तालुक्यात लाखो लिटर पाणी वाया

योगेश बरीदे

परतूर (जि.जालना)  : परतूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवहिनीला गळती लागून रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे नगर परिषद प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. परतूर शहराला पाडळी येथून निम्न दुधना प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येत असतो.  मुख्य जलवाहिनी परतूर मुख्य रस्त्यावर आहे. रमाकांत बरीदे यांच्या शेताजवळील या पाईप लाईनचा व्हॉल लिक झाल्याने लाखो लिटर फिल्टर केलेले पाणी वाया जात आहे.

सध्या परतूर तालुका दुष्काळाच्या गडद छायेत आहे. प्रकल्पात 22 टक्केच जिवंत साठा जिवंत आहे. असे असताना हे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. परतूर नगर पालिकेला कायमस्वरूपी मुख्य अधिकारी नसल्याने हि अडचण निर्माण होत असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.

''परतूर शहरातील नागरिक सध्या अनेक समस्यांना तोंड देत आहेत. शहरात पाच ते सहा दिवसाआड पाणी येते. आणि पाणी जर अशा पद्धतीने वाया जात असेल तर. आगामी काळात मोठे पाणी संकट निर्माण होईल. पालिकेने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.'' 
- आजीस काजी, माजी नगरसेवक
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT