water supply project bidkin traffic jam dmic route alternative
water supply project bidkin traffic jam dmic route alternative sakal
मराठवाडा

पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामात बिडकिन व परिसरात वाहतुकीचा अडथळा

सकाळ वृत्तसेवा

- रविंद्र गायकवाड

बिडकिन : पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामात बिडकिन व परिसरात वाहतुकीचा अडथळा निर्माण होत आहे.यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत वाहतुकीला वळण देण्याच्या दृष्टीने आज दि.२० रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कंत्राटदार कंपनी,एस टी महामंडळ वाहतुक,जीव्हीपीआर,

पीव्हीपीआर,पीएमसी,एमजीपी व स्थानिक पोलिस प्रशासन यांच्या वतीने बिडकिन बाजारतळ शेजारी असलेले कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बसस्थानक हलविण्याबाबत ची बैठक घेत पाहणी करण्यात आली आहे.

सदरची एस टी वाहतूक,जडवाहने आणि इतर वाहतूक हि गावाला वळसा घालून डि.एम.आय.सी.परिसरातुन वाहतुक वळविण्यासाठी च्या रस्त्याची हि पाहणी करण्यात आली आहे.

यावेळी बिडकिन पोलिस ठाणे येथे बैठक संपन्न झाली तसेच यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान,निलजगाव फाटा,शेकटा फाटा,डि.एम.आय.सी निलजगाव रोड ते कौडगाव शिवार पर्यंतच्या परिसर व रोडची पाहणी करण्यात आली आहे.

याबाबत निलजगाव फाटा व शेकटा फाटा या दोन्ही ठिकाणी चॅनल बॅरीकेट्स लावुन एसटी वाहतूक व जड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. तसेच दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांना प्रवेश मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

यावेळी आज दिनांक २०/०४/२०२४ रोजी पोलीस ठाणे बिडकीन येथे संबंधित विभागाचे अधिकारी व कंत्राटदार मुख्य अभियंता लोलापुर, शशी भुषण कुमार,संजीव शर्मा (जीव्हीपीआर),मदन भगत (पीएमसी), शशीकांत ढवळे (वरीष्ठ अभियंता पीव्हीआर),राम भिलवडे (एमजेपी),

खलील अहमद (कंत्राटदार जीव्हीपीआर),धीरज मुंदडा (पीएमसी),गजानन मडके (डेपो मॅनेजर एसटी महामंडळ), अरविंद जाधव (जीव्हीपीआर), बलराज दाभाडे (जीव्हीपीआर सेफटी मॅनेजर),अक्षय ठाकरे (पीएमसी),दीपक कोळी (अतिरीक्त अभियंता एमजीपी), पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील,बिडकिन पोलिस ठाणे,माणिक आष्टीकर (बिडकीन बस स्थानक नियंत्रक)नंदकुमार वैद्य व बिडकिन गावकरी यांची उपस्थिती होती.

वाहतुकीचा मार्ग कसा ठरला

पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरिल बिडकिन गावात इसारवाडी फाटा ते करमाड पर्यंत जड वाहनांची मोठी वर्दळ हि टोल चुकविण्यासाठी चालु आहे.मात्र काही दिवसांपासून वाहनांच्या रांगाच रांगा लागत असल्याने पाणीपुरवठा योजनेच्या कामात मोठा अडथळा निर्माण होत होता यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वाहतूक बदल करण्यात येणार आहे.

सदरची नविन वाहतुकीची मार्ग हा निलजगाव रोड ते डि.एम.आय.सी.परिसर ते कौडगाव शिवार असा राहणार असुन यानंतर वाहतुकीची कोंडी होणार नसल्याचे स्पष्ट केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT