ghale.jpg
ghale.jpg 
मराठवाडा

टरबुजाची विक्री होतेय कवडीमोल दरात

सुरेश घाळे


धर्माबाद, (जि. नांदेड) ः ‘कोरोना’चा संसर्ग सुरू झाल्यापासून अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. यातून शेतीही सुटलेली नाही. लॉकडाऊनमुळे धर्माबाद तालुक्यातील फळ पिकांवर संक्रांत आली आहे. ऐरवी उन्हाळ्यात टरबुजाला चांगली मागणी असते. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे टरबूज कवडीमोल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टरबुजाला मागणी नसल्यामुळे धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच भाजीपाला उत्पादक देखील या मुळे संकटात सापडले आहेत.

प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून शेती व्यवसायास आर्थिक फटका बसत आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी टरबूज, आंबा, मोसंबी आदी फळासह टोमॅटो, वांगे, भेंडी, दोडका, गोबी, कारला, मेथी, कोथींबीर, काकडी, शेवगा यासह भाजीपाल्याची लागवड केली होती. निसर्गानेही पीक चांगले दिले. परंतु ऐन टरबूज काढणीला आले. अन् देशात कोरोनाने थैमान घातले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. यामुळे भाजीपाला व फळबागा कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहे. 

काही टरबूज शेतातच नासाडी
सुरवातीच्या काळात व्यापाऱ्याने टरबुजांची बेभाव खरेदी केली. यानंतर व्यापारीही इकडे फिरकले नाहीत. लॉकडाऊनमध्ये टरबुजाला मागणीही कमी असल्याने कवडीमोल भावात विक्री करावी लागत आहे. बाजारपेठ बंद असल्याने काही शेतकऱ्यांनी घरोघरी जाऊन टरबुजाची कवडीमोल भावात विक्री केली तर काही शेतकऱ्यांनी रस्त्यावरच दुकान थाटले. शेतातून ४० टक्के टरबूज काढले असून अद्यापही शेतात ६० टक्के टरबूज पडून आहेत. तर काही टरबूज शेतातच नासाडी होत आहे.


कवडीमोल भावात टरबुजाची विक्री
या वेळी तरी उत्पन्न चांगले निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु लागवड करण्यात आलेला खर्चही निघत नसल्याने ते अडचणीत आले आहेत. यंदा टरबुजाला चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला होता. लॉकडाऊनमुळे टरबूज विक्री कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे. यावर्षी चांगले उत्पन्न होईल, अशी अपेक्षा होती. पीकही चांगले आले. परंतु कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनने टरबुजाला मागणीच नाही. सध्या गोड टरबुजाची कडू चव शेतकऱ्यांना चाखायला मिळत आहे. त्यामुळे कवडीमोल भावात टरबुजाची विक्री करावी लागत असल्याचे शेतकरी सरपंच गंगाप्रसाद डुमणे यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT