file photo 
मराठवाडा

मेडीकल कॉलेजसाठी परभणीचे नाव वगळण्याचे कारण काय ? माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे 

गणेश पांडे

परभणी ः  अधिवेशनासंदर्भात राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीत परभणीचे नाव सुध्दा नाही. परभणीचे नाव वगळण्याचे कारण काय ? असा संपप्त प्रश्न भाजपचे माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे यांनी उपस्थित केला आहे. परभणीकरांच्या भावनाशी खेळण्याचा काडीमात्र अधिकार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी एका जाहिर सभेतून परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करण्यात आले असल्याची माहिती दिली होती. या मंजुरीच्या फाईलवर सही देखील झाल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याच बरोबर परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक
यांनी देखील आगामी मंत्रीमंडळाच्या बैठकीत परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिली जाईल असे परभणीत सांगितले होते. 

सोपस्कार पूर्ण झालेले असतांनाही परभणीचे नाव का वगळण्यात आले ?

इतके सगळे झाल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्यपाल भरतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या अभिभाषणाच्या 13 व्या मुद्यात राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीचा उल्लेख आहे. त्यात उस्मानाबाद, सिंधूदुर्ग व नाशिक या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर केल्याचे म्हटले आहे. सर्व काही सोपस्कार पूर्ण झालेले असतांनाही परभणीचे नाव का वगळण्यात आले ? यात काही काळे बेरे तर नाही ना ? असा संतप्त सवाल भाजपचे माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे यांनी उपस्थित केला आहे. 

परभणीकरांच्या भावनाशी खेळू नका, आमचा अंत पाहू नका अन्यथा परभणीकरांच्या संघर्षाची ठिणगी पडल्या शिवाय राहणार नाही याची दक्षता राज्य सरकार मध्ये बसलेल्यांनी घेतली पाहिजे असा इशारा देखील श्री.गव्हाणे यांनी दिला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

SCROLL FOR NEXT