अशोक चव्हाण 
मराठवाडा

मी काही हिरोपेक्षा कमी नाही, असे कोण म्हणाले? जरुर वाचा...

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - श्री गुरू गोविंदसिंघजी स्टेडीयम येथे अशोक चव्हाण चषक खुल्या २० - २० क्रिकेट स्पर्धेचे उद्‍घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते रविवारी (ता. नऊ) झाले.  या वेळी इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत रायल चॅलेंजर बंगळुरू संघात खेळलेले रणजीपटू सरफराज नौशाद खान यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार भाई जगताप, अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दीक्षा धबाले, स्थायी समिती सभापती अमितसिंह तेहरा, सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले, किशोर स्वामी, गोविंद शिंदे नागेलीकर, दुष्यंत सोनाळे, विजय येवनकर यांच्यासह पदाधिकारी, खेळाडू, क्रीडाप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.

स्टेडीयम आधुनिक होणार
श्रीगुरू गोविंदसिंघजी क्रिकेट स्टेडीयमवर जवळपास पन्नास कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून मुंबई, पुणे, नागपूरच्या तोडीचे दर्जेदार असे स्टेडीयम नांदेडला उभारण्यात येत आहे. सध्या काम सुरू असून भविष्यात प्रकाश योजना सुविधा उभारून रात्री प्रकाशझोतात रात्रंदिवस क्रिकेट स्पर्धा चालणार आहेत. त्यामुळे अशा दर्जेदार स्टेडीयमचा स्थानिक खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.

स्टेडीयमवरील मैदानाची प्रशंसा
स्पर्धेत सर्वांनी खिलाडू वृत्तीने सहभाग घ्यावा, असे सांगून सर्व सहभागी संघाचे पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी नांदेड नगरीत स्वागत केले. सरफराज व त्यांचे वडील प्रशिक्षक नौशाद खान यांनीही स्टेडीयम मैदानाची प्रशंसा करून दर्जेदार स्टेडीयम असल्याचे सांगितले. स्पर्धेचा उद्‍घाटकीय सामना एच. यू. एस. फिल्म प्रायव्हेट लिमिटेड (मुंबई) विरुद्ध नांदेड स्ट्रायकर संघा दरम्यान आयोजित करण्यात आला. दोन्ही संघांशी पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला. या वेळी महापालिका उपायुक्त विलास भोसीकर, सुधीर इंगोले, स्टेडीयम व्यवस्थापक रमेश चवरे यांनी महापालिकेतर्फे आणलेल्या दीड कोटी रुपयांच्या आधुनिक यंत्रांविषयी माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांना करून दिली.

मुंबईने उडवला नांदेडचा धुव्वा
मुंबई विरुद्ध नांदेड उद्‍घाटकीय सामन्यात मुंबई संघाने दहा गडी राखून नांदेड स्टाईकर्सचा धुव्वा उडविला व स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत दमदार धडक मारली. मुंबईच्या भेदक गोलंदाज हरमितसिंघ रागी एकट्याने चार षटकांत केवळ पंधरा धावा देत नांदेडचे पाच गडी तंबूत पाठविले. त्याला सामनावीर घोषित करून गौरविण्यात आले. कल्पेश सवाई, हितेश सिंघ, सुमित लोंढे व गौरव शिंदेने प्रत्येकी एक एक गडी टिपला. नांदेडतर्फे गजानन गिरगावकर व दत्ता सावंत यांची झुंज एकाकी ठरली.

मी ही हिरोपेक्षा कमी नाही
उद्‍घाटनाच्या वेळी भाषणामध्ये हिरो किंवा हिरोईन समारोपासाठी बोलवा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यासंदर्भाने पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भाषणात फटकेबाजी केली. हिरो, हिरोईनला जरुर बोलवू. दोघांना आणण्याचा प्रयत्न करु. पण मी काही हिरोपेक्षा कमी नाही. आता मला जास्त दाखवता येत नाही, कारण आमचे क्षेत्र वेगळे आहे, असे श्री. चव्हाण म्हटल्यानंतर उपस्थितांनीही हसून आणि टाळ्या वाजवून दाद दिली. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

Latest Marathi News Updates : गावातील रस्त्याना आले नदीचे स्वरूप

Pune Crime : ‘एनएचएम’ मधील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोटयावधींचा गंडा; नोकरीत कायम करण्‍याच्‍या नावाखाली उकळले ७५ कोटी

Pakistan admits: मोठी बातमी! अखेर पाकिस्तानला कबूल करावंच लागलं ; 'अमेरिकेच्या मध्यस्थीसाठी कधीच तयार नव्हता भारत'

SCROLL FOR NEXT