nanded news
nanded news 
मराठवाडा

‘का’ दाखवला जातो गर्भवतींना विष्णुपुरीचा रस्ता

शिवचरण वावळे

नांदेड : राज्यात आरोग्य सेवा संचालनालयमार्फत ‘स्त्री’ रुग्णालये व सामान्य रुग्णालय चालवले जाते. गर्भवती मातांसाठी जिल्हास्तरावर ५० ते २०० खाटांचे स्त्री रुग्णालय सुरु करण्यात आलेले आहेत. शहरातील शामनगर भागात देखील टोलेजंग तीन मजली १०६ बेडचे ‘स्त्री रुग्णालय’ आहे. या रुग्णालयात गर्भवती मातांची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. मात्र, रात्रिच्यावेळी गर्भवतीमातेची रुग्णवाहिका स्त्री रुग्णालयात येताच कर्तव्यावर असलेले डॉक्टर्स आणि नर्सकडून नातेवाईकांना विनाकारण भिती दाखविली जाते. अन् थेट विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयाचा रस्ता दाखवला जात आहे.

दिवसभरात या रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती मातांच्या प्रसुती करण्यापलिकडे रात्रीचा स्टाफ काहीही करत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी अचानक प्रसूतीच्या कळा सोसत असलेल्या गर्भवती मातेला मात्र या रुग्णालयात बाहेरचा रस्ता दाखविला जातो. ‘‘आईच्या पोटात पाणी झाले, मुल पोटात संडास करण्याची भिती, नाळ गळ्या भोवती गुंडाळली, रक्तदाब जास्त झाला त्यामुळे झटके येतील, आम्हाला माता आणि बालकांची काळजी आहे त्यामुळे विष्णुपुरीच्या रुग्णालयात नेल्यास अधिक चांगले होईल’’, अशी भिती गर्भवती माता आणि नातेवाइकांमध्ये दाखवून अपुलकीचा सल्ला सर्रासपणे दिला जातो.

१०६ बेडचे रुग्णालयात रात्री ओटी बंदच                                                            स्त्री रुग्णालयात रात्री बे रात्रीच्या वेळी गर्भवती मातांची प्रसूती करण्यासाठी व ऐनवेळी सिझरची वेळ आलीच तर त्यासाठी प्रसूतीतज्ज्ञ डॉक्टर्स व नर्सचा स्टाफ उपलब्ध करुन देण्यात आला आहे. असे असताना देखिल रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असलेले डॉक्टर्स केवळ नावालाच हजेरी लावताना दिसून येतात. त्यामुळे रुग्णालयाचा भार नर्सवर येऊन पडतो. परीणामी रात्री प्रसूतीसाठीचे शस्त्रक्रिया विभाग बंद ठेवला जातो. त्यामुळे नर्स देखिल कुणाचे एकुण घेत नाहीत व आत्ताच अमुक प्रसूती झाल्या असून आमच्याकडे कपडेच शिल्लक नाहीत म्हणून सांगितले जाते.

जनमानसात रुग्णालयाची प्रतिमा खालावली                                              राज्यात आरोग्य सेवा संचालनालयामार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपविभाग रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये व सामान्य रुग्णालये मार्फत पुरविण्यात येतात. या केंद्रामध्ये आरोग्य सुविधा व उपचार पद्धती नवीन उपचारद्वारे देण्यात येतात. या रुग्णालयांचे राज्यस्तरावरून नियंत्रण केले जात असल्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसत असल्याचे नेहमी सांगितले जाते. मात्र, नांदेडच्या शामनगरमधील स्त्री रुग्णालयात कुणाचेही नियंत्रण नसल्याने अनेकवेळा दारावर आलेल्या गर्भवती मातांना विष्णुपुरी येथील शासकीय किंवा खासगी रुग्णालयाचा रस्ता दाखवला जात असल्याने स्त्री रुग्णालयाची जनमानसातील प्रतिमा कमी होत आहे.

प्रभारीवरच चालतोय कारभार                                                                  शामनगर येथील स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भारत संगेवार यांच्याकडे पदभार आहे. ते सुट्टीवर असल्याने बालरोग तज्ज्ञ डॉ. नागनाथ मुद्‍म यांच्याकडे प्रभारी चार्ज देण्यात आला आहे. सकाळच्या वेळी डॉक्टर हजर राहतात; मात्र दुपारी चार वाजेनंतर रुग्णालयात उपस्थितत राहत नाहीत. त्यामुळे प्रभारीवरच या रुग्णालयाचा चालतोय कारभार अशी नवीन ओळख निर्माण झाली आहे. भ्रमध्वरीलाही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT