Hunting
Hunting 
मराठवाडा

जिभेचे चोचले पुरवण्यासाठी वन्यजीवांच्या शिकारीचे फॅड

संकेत कुलकर्णी

औरंगाबाद - वनांत राहणाऱ्या भिल्ल, फासेपारधी, आदिवासी जमातींकडून आजवर होणाऱ्या पोटापुरत्या शिकारीचा आता व्यवसाय बनला आहे. शहरी पैसेवाले आणि उनाड लोकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी वन्यजीवांची सर्रास शिकार सुरू आहे. श्रावण सुरू होण्यापूर्वी तितर, मोर, घोरपडी आणि रानडुकरांवर संक्रांत आली असून, वनविभाग प्रतिबंधात्मक उपाय करील, अशी आशाही पर्यावरणप्रेमींना वाटत नाही. हे त्याहून विदारक सत्य आहे. 

बकरे, बैल आणि कोंबडीच्या मांसावर समाधानी न राहता लोकांना वन्यजीवांच्या मांसाची चटक लागली आणि या प्राणी-पक्ष्यांबरोबरच निसर्गाची शिकार सुरू झाली. चवबदलाच्या नसत्या आकर्षणातून वनांलगत राहणाऱ्या गावकऱ्यांना पैशाची लालूच दाखवून शिकारी पार्ट्या सुरू झाल्या. 

आता गौताळ्यापासून सारोळ्यापर्यंत आणि जायकवाडीपासून वेताळवाडीपर्यंत हौशी लोकांचे वन्यजीवांवर ताव मारणे सुरू आहे. एक कावळा वगळला, तर बाकी सर्वच पक्षी वन्यजीवांच्या ‘शेड्युल’मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांची हत्या करणे वन्यजीव कायद्यानुसार शिक्षापात्र गुन्हा ठरवण्यात आला आहे. मात्र, या कोणत्याही कायद्याला न जुमानता वनविभागाच्या नाकावर टिच्चून सर्वत्र शिकारी सुरू आहेत. हॉटेल, ढाब्यांवरून त्यांची सर्रास विक्रीही सुरू आहे. वन विभाग याकडे लक्ष देणार का, असा सवाल वनप्रेमी विचारत आहेत.

जपानी क्वेलच्या बहाण्याने जंगली तितरांची हत्या 
जपानी क्वेल हा तितरासारखाच दिसणारा पक्षी. त्याला मांसासाठी मारण्याला वनविभागाच्या परवानगीची गरज नाही. मात्र हे जपानी तितर समोर ठेवून अनेक ढाबे, हॉटेलांमधून जंगली तितर सर्रास मारले जात आहेत. शहरालगतच्या खेड्यांतून किंवा शेतातून जाळे लावून पकडलेले पक्षी ढाबेमालक विकत घेतात. दीडशे रुपये जोडीने विकत घेतलेले तितर ग्राहकाला ३०० रुपयांना विकले जाते. 

अंधश्रद्धेमुळे घोरपडीचा बळी
शहरालगतच्या डोंगरात पूर्वी घोरपड सहज दिसत असे. पण एक घोरपड खाल्ल्याने बारा हेल्यांचे बळ येते, तिच्या मांसामुळे कामशक्ती वाढते, चरबीचे तेल लावल्याने सांधेदुखी जाते, अशा अनेक अंधश्रद्धा घोरपडीचा बळी जाण्यास कारणीभूत ठरतात. यातूनच गौताळा, शुलिभंजन डोंगररांगेबरोबरच वाल्मी, सातारा परिसर, फुलंब्रीचे डोंगर आणि जटवाडा परिसरात पालं टाकून राहणारे लोक आणि वीटभट्टीवर काम करणारे मजूर घोरपड पकडून शहरात आणून विकतात. १००० रुपयांपासून १५०० पर्यंत एक घोरपड विकली जाते.

गेम मीटचे आकर्षण 
नॉनव्हेज खाणाऱ्यांना सहसा हलाल आणि झटका हे दोन प्रकार माहीत असतात; पण हायप्रोफाईल खवय्यांमध्ये गेम मीटचे आकर्षण वाढले आहे. शिकार करून कमावलेले मांस खाण्याची ही क्रेझ ससे, मोर आणि हरणाच्या पिलांच्या मुळावर उठली आहे. वनांलगत राहणारे लोक पैसे घेऊन या श्रीमंत शिकाऱ्यांना जंगलात घेऊन जातात. शिकार करून यांच्या पुढ्यात आणून टाकतात. जंगलातच कॅम्पफायर करून शिकार शिजवून खाण्याची व्यवस्थाही गौताळा, सारोळा परिसरात आणि इतर ग्रामीण भागांत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT