बनोटी (ता. सोयगाव) - प्रसूतीनंतर गोंडस बाळासह महिला.
बनोटी (ता. सोयगाव) - प्रसूतीनंतर गोंडस बाळासह महिला. 
मराठवाडा

आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारातच प्रसूती

सकाळवृत्तसेवा

बनोटी - बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावर रविवारी (ता. सहा) महिलेची प्रसूती होऊन, महिलेने गोंडस बाळास जन्म दिला.वैशाली प्रदीप भिवसने, रा. चारनेरवाडी (ता. सिल्लोड) असे या महिलेचे नाव असून, बाळासह आईची तब्येत चांगली आहे.

सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात वैशाली यांच्या वेळोवेळी तपासण्या करण्यात आल्या. प्रसूतीची तारीख जवळ आल्यामुळे पतीने वैशालीस माहेरी मुखेड (ता. सोयगाव) येथे पाठविले. प्रसूतीच्या दिलेल्या तारखेच्या दहा दिवस आधीच महिलेस त्रास होऊ लागल्याने वडील सांडू शेळके यांनी रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला. मात्र, रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने खासगी ॲपे रिक्षाने दोन किलोमीटर अंतरावरील बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. 

आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी हजर नसल्याने प्रवेशद्वारातच वाट पाहण्यात वेळ गेला. तोपर्यंत महिलेच्या वेदना वाढल्याने अंजनाबाई शेळके, रेखाबाई शिंदे, मायाबाई शेळके, सुधाकर शिंदे, दिलीप राठोड यांनी जवळच्या घरातून चादर, ब्लॅंकेट मागवून गेटवरच बाळंतपण केले. जवळपास दोन तास बनोटी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाट पाहण्यातच गेले. बाळंतपण झाल्यानंतर सेवक भाऊसाहेब कोलते आले. त्यांनी प्रवेशद्वार उघडून महिलेस आत घेतल्यानंतर बनोटी येथील खासगी डॉक्‍टरांनी तपासणी करून औषधोपचार केले. आईसह बाळाची तब्येत चांगली असल्याचे त्यांनी सांगितले.

मनमानी कारभार
बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकोणचाळीस गावे संलग्न आहेत. दोन आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर सतरा कर्मचाऱ्यांची येथे नियुक्ती आहे. आरोग्य केंद्रात डॉक्‍टर नियमित गैरहजर राहत असल्याने कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार चालतो. यामुळे रुग्णांना नेहमी आरोग्य केंद्रात चकरा मारून नाईलाजाने खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. यापूर्वीही एका महिलेस प्रवेशद्वारावरच बाळंतपणाची वेळ आली होती; तर एका रुग्णास वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याला प्राण गमवावे लागले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT