वैजयंताबाई घुंबरे 
मराठवाडा

थंडीपासून बचावासाठी चुलीसमोर बसलेल्या महिलेचा जळून मृत्यू

धनंजय देशपांडे

पाथरी (जि.परभणी) : थंडी वाढल्याने त्या पासून बचाव करण्यासाठी वाघाळा (ता.पाथरी) बुधवारी (ता.एक) चुलीसमोर बसलेल्या वैजयंताबाई घुंबरे (वय ६०) यांच्या साडीने पेट घेतला. यात त्या गंभीर भाजलेल्या त्यांचा उपचारा दरम्यान गुरुवारी (ता.दोन) सकाळी मृत्यू झाला.

काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढते असून त्यात कॅनॉलला पाणी सुटल्याने गारवा चांगलाच वाढला आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी व शरीराला ऊब मिळावी यासाठी नागरिकांकडून शेकोटीचा आधार घेतला जातोय. वाघाळा येथील वैजंताबाई रंगनाथ घुंबरे (वय ६०) या बुधवारी (ता.एक) घरातील पेटवलेल्या चुलीसमोर बसल्या होत्या. या वेळी त्यांच्या साडीने अचानक पेट घेतला. याचवेळी घरात कोणीही नसल्याने त्यांच्या किंचाळ्या ऐकून गल्लीतील काहींनी त्यांना मदत करेपर्यंत त्या ७४ टक्के भाजल्या.

वाघाळा गावावर शोककळा

गावातील शासकीय रुग्णवाहिकेद्वारे त्यांना परभणीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र,  उपचारा दरम्यान, गुरुवारी (ता.दोन) पहाटे पाच वाजता त्यांचा मृत्यू झाला. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

जिल्ह्यात काही दिवसांपासून थंडीचा कडाका
 जिल्ह्यात वातावरणात सतत बदल सुरू असून थंडीचा कडाका वाढत आहे. मागील काही दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण कायम आहे. दररोज पहाटे आभाळ भरून येत आहे. मंगळवारी जिल्ह्यात पाऊसही झाला. सतत आठ दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवरदेखील परिणाम झाला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहत असून दिवसातून एखादावेळच सूर्यदर्शन होत आहे. बुधवारीदेखील दुपारी दोन वाजेपर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. त्यानंतर हळुवारपणे सूर्यदर्शन झाले. मात्र, त्यात तीव्रता नसल्याने स्वच्छ सूर्यप्रकाश पडला नाही. सायंकाळी पुन्हा आभाळ भरून आले होते. त्यानंतर गुरुवारी (ता.दोन) सकाळी पुन्हा अवकाळी पाऊस झाला. अशा वातावरणाचा रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम झाला आहे. तसेच दिवसभर थंडगार वारे सुरू राहत असल्याने हुडहुडी भरत आहे. रात्रीच्या वेळीदेखील थंडीचा कडाका वाढलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत..., विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणीवर राज ठाकरे चिडले

Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय कॅबिनेट बैठकीला सुरुवात, पेपरफुटी प्रकरणावर चर्चा होणार?

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

SCROLL FOR NEXT