मराठवाडा

लोकवर्गणीतून महिलांनी खोदली कूपनलिका 

सकाळवृत्तसेवा

मंगरूळ (जि. उस्मानाबाद) - यंदाच्या अत्यल्प पावसामुळे गावागावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. मंगळूरमध्येही याच परिस्थितीशी महिला दोन हात करत आल्या. गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महिलांनी एकत्र येत 25 हजार रुपयांची वर्गणी गोळा केली. त्यातून कूपनलिका खोदली. या कूपनलिकेला बऱ्यापैकी पाणी लागल्याने काहीअंशी तरी पाणीटंचाईवर मात करणे शक्‍य झाले आहे. 

गावाला नळाद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या सार्वजनिक विहिरीने तळ गाठला आहे. प्रत्येक घराच्या वाट्याला येणारे पाणी कमी आहे. नोव्हेंबर महिन्यातच ही स्थिती असल्याने पुढील चार महिने कसे घालवायचे, असा प्रश्न महिलांना पडला. त्यामुळे महिलांनी पुढाकार घेऊन प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे एका तासात 25 हजार रुपये वर्गणी जमा केली. त्यातून महावीर चौकात कूपनलिका खोदली. कूपनलिकेला पाणी लागल्याने सुमित्रा गायकवाड, राणी माळी, शामल जाधव, शोभा तौर, पुष्पा बागरेचा, हाशीना पठाण आदी महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला. उसनवारीने कूपनलिकेसाठी वीजपंप खरेदी करण्यात आला. गावात या महिलांचे कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT