Nandini.jpg 
मराठवाडा

अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय...

सुनिल पौळकर

मुखेड, (जि. नांदेड) ः शहरातील वैद्यकीय व्यवसायात असलेले संतोष एकाळे यांची मुलगी नंदनी एकाळे (वय १२) वर्ष हिने चक्क डोळयावर पट्टी बांधुन नोटांचा नंबर व विविध प्रकारचे पुस्तक वाचन केल्याने तालुक्यातील नागरीकांना आश्यर्याचा धक्काच बसला तर अनेकांनी अद्भुत, अविश्वसनीय व अकल्पनीय असल्याचे म्हटले आहे.

नंदीनी एकाळे सध्या मुखेड तालुक्यातील सलगरा येथील इंदिरा गांधी विद्यालय येथे ६ वी वर्गात शिक्षण घेत आहे. तीच्या डोळयावर पट्टी बांधुन ती चक्क नोट व नोटावरील नंबर ओळखणे, वस्तु ओळखणे, रुमालवरील रंग ओळखणे, पुस्तकावरील अक्षर ओळखणे, आय.डी कार्ड ओळखणे व त्याच्यावरील नाव ओळखणे अशा विविध प्रकारचा अकरा बाबी ती सहज ओळखु शकते.

कल्पना शक्तीच्या जोरावर

अदृश्य असताना ओळखते कसे या विषयी नंदीनीला विचारले असता नंदीनी म्हणते, मी डोळे मिटल्यानंतर माझ्या हातातील चित्र माझ्या बुध्दीमध्ये तयार होते व कल्पना शक्तीच्या जोरावर मी डोळयावर पट्टी बांधुन सुध्दा नोटेवरील नंबर असो अथवा पुस्तकावरील लिखाण सहज ओळखु शकते असे म्हणाली.

ही कला केवळ तीन आठवडयात अवगत केली

नंदीनीच्या वडीलाकडुन या कलेविषयी माहिती विचारली असता त्यांनी सागितले की, हैद्राबाद येथे माझे मित्र लक्ष्मण राठोड हे आहेत. त्यांना माझ्या मुलीच्या गुणवत्तेविषयी सांगितले असता त्यांनी ही कला माझ्या मुलीस शिकवली. ही कला ६ ते १२ वयोगटातील मुलींनाचा शिकवता येते व अनेकांना शिकविले असता सुध्दा त्यांना अवगत होत नाही पण नंदीनीने ही कला केवळ तीन आठवडयात अवगत केली असुन यामुळे तीच्या अभ्यासावर जास्त लक्ष जात असुन एक वेळेस पाठांतर केले असता तीला सहज लक्षात सुध्दा राहत आहे. यामुळे तीच्या गुणवत्तेवर याचा मोठा परिणाम दिसुन येऊन लागला आहे असे म्हणाले.

शिक्षकही तीच्या या गुणवत्तेमुळे आचंभित झाले

नंदीनीच्या या गुणामुळे तीचे तालुक्यातील अनेक शाळेमध्ये कार्यक्रम होत असुन तीच्या गुणवत्तेमुळे अनेक विद्यार्थ्याना याचा फायदा होणार असुन शाळेतील शिक्षकही तीच्या या गुणवत्तेमुळे आचंभित झालेले आहेत तर अनेकांनी तीच्या मुलाखती सुध्दा घेतलेल्या असुन खरंच डोळयावर पट्टी बांधुन सर्वकाही डोळे उघडे असल्यासारखेच सांगत असल्याने अनेकांना अद्भुत, अविश्वसनीय व अकल्पनीय असेच वाटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC आरक्षणात मोठा बदल! दोन महत्त्वाची विधेयके विधानसभेत मंजूर; नव्या कायद्याला हिरवा कंदील, कुणी घेतला निर्णय?

Ben Stokes Retirement Reason: ऑस्ट्रेलियात नेमकं काय घडलं? बेन स्टोक्सने निवृत्तीचं खरं कारण सांगितलं म्हणाला माझ्यात आता...

Pune News: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! फार्मसी प्रवेश प्रक्रिया वेळेत, महाविद्यालयांना ७ दिवसांत मान्यता, पुण्यात PCI अध्यक्षांची घोषणा

Latest Marathi News Live Update: न्यायाधीशांच्या न्यायालयात ७३७ पानांचे सविस्तर आरोपपत्र दाखल केले

Water Palaces: ऐतिहासिक सौंदर्याचा नजराणा ! भारतातील ५ सर्वात सुंदर 'वॉटर पॅलेस' पाहिलेत का ?

SCROLL FOR NEXT