परभणी जिल्हा रुग्णालयात परिचारिकांचा संप
परभणी जिल्हा रुग्णालयात परिचारिकांचा संप 
मराठवाडा

परिचारिकांच्या संपामुळे परभणी जिल्हा रुग्णालयातील कामकाज ठप्प

गणेश पांडे

परभणी ः सर्वस्तरावरील १०० टक्के कायमस्वरुपी पदभरती करण्यात यावी, अतिरिक्त खाटांसाठी नव्याने पदनिर्मिती करण्यात यावी, परिसेविका, अधिसेविका व पाठ्य निर्देशिका पदाची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावी या इतर मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्यावतीने बुधवारी (ता. २३) जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी काम बंद आंदोलन केले. दरम्यान, परिचारिकांनी पुकारलेल्या बंदमुळे कामकाज ठप्प पडले होते.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिकांनी गेल्या दोन दिवसापासून आंदोलन सुरु केले आहे. ता. २१ व २२ जुन रोजी अर्धवेळ काम बंद आंदोलन करण्यात आले होते. बुधवारी (ता. २३) सकाळपासून परिचारिकांनी पूर्णवेळ कामबंद आंदोलन केले. यावेळी जिल्हा रुग्णालयातील सर्व परिचारिका या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कामकाज पूर्णत: ठप्प पडले होते. परिचारिकांनी सर्वस्तरातील १०० टक्के कायमस्वरुपी पदभरती करण्यात यावी, अतिरिक्त खाटांसाठी नव्याने पदनिर्मिती करण्यात यावी, परिसेविका, अधिसेविका, पाठ्य निर्देशिका पदांची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावी, राज्यातील परिचारिका संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे जोखीम भत्ता द्यावा, कोविड काळात सात दिवस कार्यकाळ व तीन दिवस अलगीकरण रजा कायम ठेवावी, कोरोना काळात बंद केलेली साप्ताहिक सुट्टी ही देण्यात यावी, कोरोना काळात परिचारिकांच्या रजा स्थगित केल्यामुळे अर्जित रजा ३०० पेक्षा जास्त शिल्लक राहून रद्द होत आहेत. त्या शिल्लक ठेवण्याची व पुन्हा उपभोगण्याची परवानगी देण्यात यावी आदी १२ मागण्या परिचारिका संघटनेच्यावतीने करण्यात आल्या आहेत. सकाळी सर्व परिचारिका जिल्हा रुग्णालयातील आवारात एकत्र जमल्या होत्या. मागण्याच्या यावेळी घोषणा देण्यात आल्या.

हेही वाचा - नातेवाईकांना भेटून प्रवास भाड्याला पैसे नसल्याने राऊत गावी पायी चालले होते

शिकाऊ परिचारिकांनी सांभाळली जबाबदारी

जिल्हा रुग्णालयातील सर्व परिचारिकांनी बुधवारी आंदोलन पुकारल्याने दवाखान्यातील सुश्रुषांची कामे बंद पडली होती. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने तातडीने शिकाऊ परिचारिकांना या कामी तैनात केले. दिवसभरात याच परिचारिकांनी कामे सांभाळली.

आम्ही आमच्या मागण्यासाठी वारंवार संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे निवेदन पाठवित आहोत. मागण्या पूर्ण न झाल्यास ता. २५ जून पासून आम्ही बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

- सुजाता कांबळे, उपाध्यक्ष, परिचारिका संघटना, परभणी

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT