Udgir
Udgir sakal
मराठवाडा

Udgir News : साडेचारशे हेक्टर येणार ओलिताखाली ; उदगीर तालुक्यात ११ बंधाऱ्यांची कामे सुरू, कासराळला भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा

उदगीर : मृद व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत तालुक्यातील कासराळ येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे भूमिपूजन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शनिवारी (ता.चार)करण्यात आले. उदगीर तालुक्यातील अकरा कोल्हापुरी बंधाऱ्यांमुळे परिसरातील ४५० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती होऊन त्यांचे जीवनमान उंचावावे म्हणून जलसंधारणाची कामे केली जात असल्याचे संजय बनसोडे यांनी नमूद केले. कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, महावितरणचे कार्यकारी सायस दराडे, वाढवणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बी.एस. गायकवाड, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल कांबळे, सरपंच दयासागर यल्लावाड, ज्ञानोबा शेळके, सुरेखा पाटील, भरत चामले, ब्रह्माजी केंद्रे, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, सय्यद जानीमियाँ, फय्याज शेख, इब्राहिम पटेल, बाळासाहेब मरलापल्ले, नवनाथ गायकवाड, शशिकांत बनसोडे, नागेश थोंटे, संजय पवार, बालाजी भोसले, प्रशांत चामे, प्रभाकर पाटील, वसंत पाटील आदी उपस्थित होते.

संजय बनसोडे म्हणाले, की हा भाग दुष्काळी असल्याने पाण्याचे प्रमाण कमी होते. या भागाचा अभ्यास करून एक मास्टर प्लान तयार केला. या परिसरात मागील ४० वर्षापूर्वी बंधारे झाले होते. त्याची अतिशय दुरवस्था झाल्याने या भागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नव्हता. ही बाब लक्षात आल्यानंतर तालुक्यातील कासराळला तीन, सुमठाणा, वाघदरी, टाकळी येथे प्रत्येकी दोन, कौळखेड व चांदेगावला प्रत्येकी एक असे एकूण ११ कोल्हापुरी बंधारे मंजूर करून घेतले. तसेच आरसनाळ येथील एका साठवण तलावाचाही समावेश आहे. एक साठवण तलाव व ११ कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी एकूण ३० कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या बंधाऱ्यामुळे उदगीर तालुक्यातील ४५० हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली येणार आहे. या भागातील पाणीटंचाई ही कमी होणार आहे. मतदार संघात नागरिकांना लागणाऱ्या सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देऊन उदगीरच्या विकासाचा नवा पॅटर्न महाराष्ट्रात निर्माण केला. आणखी नवीन सात कोल्हापुरी बंधारे मंजूर केले, यामध्ये धडकनाळला दोन, बोरगाव, लिंबगाव, देवर्जन, नळगीर, नागलगावला प्रत्येकी एक असा एकूण ७ कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी १० कोटी ६९ लाख रुपये मंजूर केले, त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचेही क्रीडामंत्री बनसोडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT