Worker killed in accident at Palasi
Worker killed in accident at Palasi 
मराठवाडा

औरंगाबाद : मजुराच्या अंगावरून गेले ग्रेडर मशीनचे चाक

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - प्रस्तावित समृद्धी महामार्गावर रोजंदारी कामगाराच्या अंगावरून ग्रेडर मशीन गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना पळशी शहर (ता. औरंगाबाद) येथे सोमवारी (ता. 11) सायंकाळच्या सुमारास घडली. जनार्दन दशरथ दहीहंडे (वय 40) असे या मृताचे नाव आहे. तो पळशी या गावातीलच रहिवासी आहे. 

प्रस्तावित समृद्धी महामार्ग हा पळशी शहर या गावातून जात असून, मागील एक वर्षापासून या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. सध्या रस्त्यावर अवजड वाहनांच्या साह्याने माती, मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. याच रस्त्याच्या कामावर गावातील आणि परिसरातील काही मजूर रोजंदारीवर ठेवण्यात आले आहे. जनार्दनसुद्धा येथे मागील काही महिन्यांपासून
रोजंदारीवर काम करीत होता.

सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर असताना त्याच्या अंगावरून ग्रेडर मशीन गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात चालकाने हलगर्जीपणा केल्याने एका तरुणाला जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. जनार्दन हा पळशी येथील माऊलीनगरमध्ये राहत होता. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले आहेत. 
 
सर्वांत मोठा सर्वांत मोठा 'एक्‍स्प्रेस वे'  
औरंगाबाद - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन महिन्यांत भूमिपूजन होणार असून, 17 ठिकाणांहून एकाच वेळी प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. विशेष म्हणजे हा महामार्ग आशियातील 701 किलोमीटर अंतर असलेला सर्वांत मोठा "एक्‍स्प्रेस वे' ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Latest Marathi News Live Update : MoCA ने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत मागवला अहवाल

SCROLL FOR NEXT