file photo 
मराठवाडा

Video: कामगारांची नोंद होत नसल्याच्या  निषेधार्थ भाकपचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

परभणी : परभणी जिल्ह्यात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यालयात कामगारांची नोंद शासन निर्णय तरतुदीनुसार होत नाही व इतर लाभ मिळत नसल्याच्या कारणावरून भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने मंगळवारी (ता.११) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास सुरवात करण्यात आली आहे.

इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनिय १९७६ व महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळ तरतुदीनुसार करार झाला. उपकर वसुल करून मंडळाकडे जमा होत आहे. तो निधी कल्याणकारी योजनेसाठी वापरण्यात येतो. परंतू, परभणी जिल्हयात अनेक समस्या आहेत. महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळात शासन निर्णयानुसार नोंद केल्या जात नाही. सद्या परभणी जिल्ह्यात कामगारांची नोंद घेणे बंद आहे. कामगारांची नोंद घेण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. गावस्तरावर या योजनेची माहिती नोंद घेणे आवश्यक आहे. परंतू, कामगार अधिकारी व जिल्हा परिषद अधिकारी सुस्त आहेत, परिणामी दलालामार्फत नोंदणी केली जात असल्याचा आरोपी या वेळी आंदोलकांनी केला. शासनाच्या तरतुदीनुसार कामगारांच्या नोंदी व लाभ मिळाला पाहिजे. यासाठी मंगळवारी (ता.११) भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास सुरवात करण्यात आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व राजन क्षीरसागर यांनी केले. या वेळी प्रकाश गोरे, ज्ञानोबा गोरे, गणेश इनोरे, प्रसाद गोरे, मितेश सुक्रे आदीं सहभागी झाले.

अश्या आहेत मागण्या

शासन तरतुदीनुसार गावपातळीवर बांधकामाच्या ठिकाणी जावून तात्काळ नोंदणी करण्यात यावी, गावपातळीवर ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक देत नाहीत. ते त्वरीत देण्यात यावेत, न देणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करावी, शासन निर्णयानुसार गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी कामगारांच्या नोंदी कराव्यात व कामगार कार्ड तात्काळ देण्यात यावे, प्रत्येक गावस्तरावर कामगार कार्यालयातन जनजागृती जाहिरात करावी, कामगार कार्यालयातील दलालांना आवर घालावा आदी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासकीय इमारतीला भीषण आग; पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत वापर झालेल्या ४ हजार ईव्हीएम जळून खाक, काय घडलं?

मधुभाऊ सायलीला सत्य सांगणार; तीच खरी तन्वी असल्याचं उघड होणार; 'ठरलं तर मग' मध्ये मोठा ट्विस्ट, प्रोमो पाहून नेटकरी खुश

अभिनय, क्रिकेट टिमच्या ओनरशिपनंतर प्रीती झिंटा आता दागिन्यांच्या व्यवसायात! लॉन्च केला नवीन लक्झरी ज्वेलरी ब्रँड

Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक असतात प्रचंड हसमुख, पण एका चुकीच्या घटनेमुळे बदलून जाते त्यांचे आयुष्य

Latest Marathi News Live Update : नागपूर शहरातील काही भागात पावसाच्या सरी

SCROLL FOR NEXT