आमदार बालाजी कल्याणकर यांनी तहसील कार्यालय येथे बैठक घेतली. 
मराठवाडा

कामगार, गरिबांच्या मदतीसाठी अन्नधान्य जमा करणार - आमदार बालाजी कल्याणकर

अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाने आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असून नांदेड तालुक्यात दोन हजार ९३ नागरिक बाहेरुन दाखल झाले आहेत. या नागरिकांना व कामगार, गरिबांना मदत करण्यासाठी दानशूर नागरिकांनी शहरात सुरु करण्यात येणाऱ्या सहा अन्नधान्य बँकांमध्ये अन्नधान्य जमा करावे, असे आवाहन शिवसेनेचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी केले आहे. सदर संकलित झालेले अन्नधान्य हे जिल्हा प्रशासनामार्फत गरजूंपर्यंत पोहचविले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना विषाणू हा संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आमदार कल्याणकर यांनी मंगळवारी (ता. ३१) तहसील कार्यालय येथे बैठक घेतली. यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले. या बैठकीला तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड, तालुका पुरवठा अधिकारी नायब तहसिलदार सारंग चव्हाण, महसूलचे नायब तहसिलदार मुगाजी काकडे, नायब तहसीलदार पाटील, गटविकास अधिकारी तोटावाड व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.

तीन महिन्याचे रेशन मिळणार
राज्य शासनाने तीन महिन्याचे स्वस्त धान्य देण्याचा निर्णय घेतला असून उद्या किंवा परवापासून रेशन वाटपास सुरुवात करण्यात येणार आहे. एप्रिलच्या एक ते दहा तारखेपर्यंत एप्रिल महिन्याचे रेशन, ता. दहा ते ता. २० एप्रिलपर्यंत मे महिन्याचे रेशन तर ता. २० ते ता. ३० एप्रिलपर्यंत जून महिन्याचे रेशन वाटप करण्यात येणार आहे. रेशन वाटपावेळी नागरिकांची एकाच वेळी गर्दी होवू नये, यासाठी खबरदारी म्हणून असे तीन टप्पे पाडण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

रेशनच्या लाभापासून कुटुंब वंचित राहू नये
नांदेड तालुक्यात एकूण चार लाख शिधापत्रिकाधारक असून त्यांना तीन महिन्यासाठी ५१  हजार क्‍विंटल धान्य लागणार आहे. काही कुटुंबांकडे शिधापत्रिका नाही. अशा कुटुंबांचा सर्व्हे बिल कलेक्टर व स्वस्त धान्य दुकानदारांकडून सुरु असून ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे मात्र, ऑनलाईन इंन्ट्री नाही, असे कुटुंबही रेशनच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार कल्याणकर यांनी सांगितले. अंत्योदय शिधापत्रिकाधारक यांना तांदूळ २० किलो, गहू १५ किलो व साखर एक किलो तर प्राधान्य शिधापत्रिकाधारकांना तांदूळ दोन किलो व गहू तीन किलो देण्यात येणार असून नांदेड तहसील कार्यालयामार्फत दहा टन धान्य वाटप होणार आहे. 

धान्य वाटपात कुचराई, दिरंगाई नको
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ किलो ब्लिंचिंग पावडर व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत वैद्यकीय साहित्य पोहचती करण्यात आल्याचेही आमदार कल्याणकर यांनी आढावा बैठकीनंतर बोलताना सांगितले. स्वस्त धान्य वाटपात कुचराई, दिरंगाई अथवा अनियमितता केल्यास संबंधित स्वस्त धान्य दुकानदारविरुध्द साथरोग प्रतिबंधित कायदा १८९७ भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १८८ आणि महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम अंतर्गत कार्यवाही करण्याच्या सुचनाही या आढावा बैठकीत प्रशासना देण्यात आल्याचे आमदार कल्याणकर यांनी सांगितले. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT