World Photography Day Shripad Pathak article  
मराठवाडा

World Photography Day : कॅमेऱ्यांचे डॉक्‍टर श्रीपाद पाठक

मधुकर कांबळे

औरंगाबाद -  काळाला थांबवता येत नाही; पण कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आठवणींना मात्र कैद करून ठेवता येते. एखादे दृश्‍य कायम आपल्या डोळ्यांपुढे राहावे यासाठी आपण कॅमेऱ्याच्या मदतीने ते दृश्‍य साठवून ठेवतो; मात्र हा कॅमेरा मध्येच बंद पडला तर सारा मूडच खराब; पण अशा आजारी पडणाऱ्या कॅमेऱ्यांचे आजारपण दूर करण्याचे काम २५ वर्षांपासून श्रीपाद पाठक अविरत करीत आहेत. आज मोबाईल फोनमध्ये कॅमेरे आल्याने फक्त फोटोग्राफीसाठी असलेल्या कॅमेऱ्यांची संख्या कमी झाली. असे असताना श्री. पाठक यांचे काम सुरूच आहे.

जगभरात १९ ऑगस्ट हा ‘जागतिक छायाचित्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. वेगवेगळ्या छायाचित्रांची दखल घेतली जाते. प्रदर्शनं भरवली जातात; मात्र या मंत्रमुग्ध करणाऱ्या छायाचित्रांना ज्या कॅमेऱ्याने कैद केले जाते त्या कॅमेऱ्यांची दुरुस्ती करणाऱ्यांची भूमिकाही फोटोग्राफीत तितकीच महत्त्वाची. निराला बाजारजवळील जयहिंद कॉलनीतील श्रीपाद पाठक हे कॅमेरा, फ्लॅश गन आणि लेन्सच्या दुरुस्तीचे काम करतात. ते म्हणाले, ‘‘मानवतमध्ये माझे वडील अरुणराव पाठक यांचे कॅमेऱ्यांचे दुकान होते. १९७० पासून ते तब्बल चाळीस वर्षे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅमेऱ्यांची दुरुस्ती करीत. ज्यावेळी कॅमेऱ्याचे स्पेअर पार्ट मिळायचे नाहीत त्यावेळेस ते अक्षरशः सोनाराकडे जाऊन छोटे छोटे पार्टस्‌ तयार करून घ्यायचे. त्यावेळचे ते मराठवाड्यातील कॅमेरा दुरुस्त करणारे एकमेव जाणकार होते. माझे वडील आणि मुंबईला कॅमेरा दुरुस्तीचे काम करणारे माझे काका भार्गव के. पाटील यांच्याकडून मी कॅमेरा दुरुस्त करायला शिकलो आणि गेल्या २५ वर्षांपासून औरंगाबादमध्ये स्वतंत्रपणे कॅमेरा दुरुस्तीचे काम करीत आहे.’’

लेन्स हा कॅमेऱ्याचा आत्माच 
पूर्वी बॉक्‍स कॅमेरे होते. त्यानंतर रोलचे फिल्म कॅमेरे आले. त्यानंतर कलर आणि आता कलर डिजिटल कॅमेरे आले. कॅमेऱ्यामध्ये कितीही बदल झाले, कितीही तंत्रज्ञान आले तरी लेन्स हा सर्व कॅमेऱ्यांचा आत्मा असतो. मी सर्वच प्रकारच्या कॅमेऱ्यांची दुरुस्ती करतो. औरंगाबादसह मराठवाडा आणि इतर ठिकाणांहून कॅमेरे दुरुस्तीसाठी येतात. एकदा अमेरिकेतून पर्यटनासाठी आलेले अनिवासी भारतीय अवधेशचंद्र मिश्रा हे त्यांचा कॅमेरा अचानक बंद पडल्याने गुगल मॅपवरून माझा पत्ता शोधत दुकानात आले होते. त्यांचा कॅमेरा लगेच दुरुस्त करून दिला. त्यांनी नंतर गुगलवर माझ्या कामाचे कौतुक केले. हे माझ्यासाठी फार मोठे प्रोत्साहन असल्याचे ते म्हणाले.

कॅमेरा दुरुस्त करण्याबरोबरच मला फोटोग्राफीचा छंद आहे. २००२ पासून तिरुपती येथील ब्रह्मोत्सवामध्ये दरवर्षी ब्रह्मोत्सवाची फोटोग्राफी करीत असतो. मोबाईल फोटोग्राफीमुळे कॅमेरा दुरुस्ती व्यवसायावर आणि व्यावसायिक फोटोग्राफीवर गंडांतर आले आहे. असे असले तरी पूर्वीचे फोटोग्राफीचे मर्यादित क्षेत्र आता विस्तारले आहे. अनेक हौशी फोटोग्राफर वाढत आहेत. मोबाईल फोटोग्राफीमुळे छोटे ‘पॉइंट अँड शूट’ घरगुती कॅमेरे बंद झाले आहेत. आता डिजिटल ‘एसएलआर’ कॅमेऱ्यांकडे ओढा वाढत आहे.
- श्रीपाद पाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT