Gajanan Misal sakal
मराठवाडा

World Record : गजानन मिसाळचा जागतिक विक्रम; दुचाकीवर हात सोडून १११ किलोमीटरचा प्रवास

गजानन बबनराव मिसाळ यांनी बुलेटच्या मागील बाजूस हात सोडून बसत दोन तास २७ मिनिटे ५४ सेकंद या वेळेत तब्बल १११ किलोमीटरचा प्रवास करून नवीन विक्रम नोंदवला.

सकाळ वृत्तसेवा

गजानन बबनराव मिसाळ यांनी बुलेटच्या मागील बाजूस हात सोडून बसत दोन तास २७ मिनिटे ५४ सेकंद या वेळेत तब्बल १११ किलोमीटरचा प्रवास करून नवीन विक्रम नोंदवला.

जालना - भारतीय सैन्य दलात नायक पदावर कार्यरत असलेले मांडवा (ता. जालना) गावचे भूमिपुत्र गजानन बबनराव मिसाळ यांनी बुलेटच्या मागील बाजूस हात सोडून बसत दोन तास २७ मिनिटे ५४ सेकंद या वेळेत तब्बल १११ किलोमीटरचा प्रवास करून नवीन विक्रम नोंदवला आहे. या यशाबद्दल जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी रविवारी (ता.पाच) त्यांचा सत्कार करून रोख ११ हजार रुपयांचे बक्षीस दिले.

गजानन मिसाळ हे मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर येथे भारतीय सैन्य दलात नायक पदावर कार्यरत आहे. सैन्य दलाच्या राष्ट्रीय पातळीवर असलेल्या डेअर डेविल्स मोटार सायकल संघाचे ते प्रतिभावान खेळाडू आहेत. भारताने १९७१ मध्ये युद्धात विजय मिळवला होता. तेव्हापासून तो दिन भारतीय सैन्य दलातर्फे विजय दिन म्हणून साजरा केला जातो.

या दिनाचे औचित्य साधून भारतीय सैन्य दलातर्फे जबलपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मांडवा येथील भूमिपुत्र गजानन मिसाळ यांनी आपले दोन्ही हात सोडून बुलेटच्या करिअरवर बसत तब्बल १११ किलोमीटरचे अंतर केवळ दोन तास २७ मिनिटे ५४ सेकंदात पार करत जागतिक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुक लिम्का बुक एशिया बुक बेस्ट ऑफ इंडियामध्ये झाली आहे.

श्री. मिसाळ यांना आतापर्यंत २०१६, २०१९ आणि यावर्षी २६ जानेवारी २०२३ रोजी असे तीन वेळा भारताच्या राष्ट्रपतींना सलामी देण्याचा मान मिळाला आहे. या कामगिरीबद्दल जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी त्यांचा निवासस्थानी शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन तसेच रोख ११ हजार रुपयांचे बक्षीस देत यथोचित गौरव केला.

यावेळी सुदर्शन उबाळे, अरुण घडलींग, रमेश सीरसाट, ज्ञानेश्वर उबाळे, अभिजित उबाळे आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT