वसमत योग दिन संपन्न 
मराठवाडा

वसमत येथे जागतीक योग दिन

जिल्हा क्रीडा अधिकारी मारोती सोनकांबळे व संजय बेतीवार यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष नांगरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते

संजय बर्दापूरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली, अजिंक्य मानव विकास प्रतिष्ठान वसमत व हिंगोली जिल्हा स्पोट्स कराटे डॅाक्टर्स असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक योग दिवसाचे आयोजन जिल्हा परिषद प्रशाला येथे सोमवार ( ता. २१ ) करण्यात आले होते.

जिल्हा क्रीडा अधिकारी मारोती सोनकांबळे व संजय बेतीवार यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष नांगरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी वैदयकीय अधिकारी डाॅ. सागर बहने यांनी भुषवीले तर प्रमुख अतिथी मेजर गंगाधर मोरे, देवानंद सोनाळे, शेख मोईन आदी मान्यवर उपस्थीत होते.

हेही वाचा - नांदेड : चाभरा येथील 33 केव्ही उपकेंद्र तातडीने उभारावे- दत्ता पाटील पांगरीकर

निकिता फेगडे हीने योगाचे फायदे सांगितले. योग शिक्षिका म्हणून मनिषा नांगरे यांनी उपस्थीत प्रमुख पाहुणे व खेळाडूंकडून पूरक व्यायाम व ताडासन , वृक्षासन, कोनासन, अर्ध चक्रासन, वक्रासन, अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम आदी योगासने केली.

दररोज योगासने केल्याने देहाची, मनाची शुद्धी होते. शरीर सृदृढ राहते, निरोगी शरीरात सकारात्मक विचार राहतात. म्हणून योगा डेनिमित योगा न करता दररोज योगा करावा असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सागर बहणे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता श्रीकांत जाधव, आभिषेक वाघ, अनिकेत नरवाडे, श्रीधर पांचाळ, सुबोध गायकवाड, धनश्री पांचाळ, स्मिता कस्तुरे यांनी परिश्रम घेतले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT