Yermala sakal
मराठवाडा

Yermala News : येरमाळा पत्रकार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेला अभ्यासिका व्यायामशाळेसाठी पन्नास लाख रुपये निधी मंजुर

दीपक बारकूल येथील येरमाळा पत्रकार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेला राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने अभ्यासिका व्यायामशाळेला पन्नास लाख रुपये निधी मंजुर केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

येरमाळा - दीपक बारकूल येथील येरमाळा पत्रकार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेला राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने अभ्यासिका व्यायामशाळेला पन्नास लाख रुपये निधी मंजुर केला आहे. या अभ्यासिका व्यायामशाळेच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन माजी सरपंच तथा माजी पं. स. सभापती विकास बारकूल यांच्या हस्ते करण्यात आले.

येथील येरमाळा पत्रकार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने ग्रामपंचायतला गावातील विद्यार्थी, तरुणांना व्यायामशाळा बांधण्यासाठी जागेची मागणी केली होती. यासाठी सतत्याने पाठपुरावाही केला होता. ग्राम पंचायतने पत्रकार संथेच्या मागणी प्रमाणे वर्षभरपुर्वी जागा दिली होती. पत्रकार संस्थेच्या बऱ्याच दिवसापासूनच्या नियोजित सामाजिक कामाच्या उद्देशाच्या मागणीला यश आले. आणि ग्राम विकास मंत्रालयाने डिसेंबर महिन्यात अभ्यासिका व्यायामशाळेसाठी पन्नास लाख निधीला मंजूर केला.

इमारतीच्या बांधकाम कामाच्या प्रशासकीय स्तरावर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असुन अभ्यासिका, व्यायामशाळा इमारतीच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याने मंगळवारी (ता. १४) दुपारी दीड वाजता या इमारतीच्या कामाचे माजी सरपंच विकास बारकूल यांच्या हस्ते नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले.

या वेळी उपसरपंच गणेश बारकूल,माजी जि. प. सदस्य मदन बारकूल, सोमा बारकूल, तानाजी बारकूल, खंडेराव भातलवंडे, सुधीर पायाळे, सुधाकर चिलवंत, तर पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सचिन बारकूल, सचिव दत्ता बारकूल, सदस्य बालाजी रमेश बारकूल, सुधीर लोमटे, दत्ता गायके, सुखदेव गायके, कल्लेश भोसले, मिलिंद देशमुख उपास्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLA Committee: आमदार समितीच्या दौऱ्याला पहिल्याच दिवशी दांडी; २७ पैकी फक्त ८ आमदार उपस्थित, अनियमितता आढळल्याने कारवाईची शक्यता

IND vs SLC XI Warm UP Match: श्रीलंकेच्या सलामीवीरांनी टीम इंडियाला रडवले; ६ गोलंदाज वापरूनही विकेट मिळेना, मानव सुथारच्या...

Thailand School Shooting : थायलंड हादरले ! आठवीच्या विद्यार्थ्याचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; शिक्षकासह दोघांचा मृत्यू, १० विद्यार्थी गंभीर जखमी

Cricketer Retirement: चक्क २५ व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती! युवा वेगवान गोलंदाजाचा धक्कादायक निर्णय

Jalgaon Flyover Proposal : जळगाव महामार्गावर होणार 3 नवीन उड्डाणपूल! खासदार स्मिता वाघ यांच्या प्रस्तावाला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद, 'त्या' पुलाचीही घेतली गंभीर दखल

SCROLL FOR NEXT