Young boy suicide in kej beed for the matang community reservation
Young boy suicide in kej beed for the matang community reservation  
मराठवाडा

व्हिडीओ तयार करुन आरक्षणासाठी तरुणाने घेतली जलसमाधी (व्हिडीओ)

सकाळवृत्तसेवा

बीड : केज तालुक्यातील साळेगाव येथील एका युवकाने आज मंगळवार दि. 5 रोजी बीड तालुक्यात असलेल्या पाली तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्यापुर्वी संजय ज्ञानोबा ताकतोडे या तरुणाने एक व्हिडीओ क्लिप तयार केली आहे, ज्याच्या माध्यमातून मातंग समाजाच्या आरक्षणासाठी व फडणवीस सरकारला जागे करण्यासाठी आत्महत्या करत असल्याचे मत त्याने व्यक्त केले होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत, युवकाचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

केज तालुक्यातील साळेगाव येथील संजय ज्ञानोबा ताकतोडे वय 34, हा तरुण सोमवारी रात्रीपासूनच बेपत्ता होता. मंगळवारी बीड तालुक्यातील पाली तलावाजवळून एक व्हीडीओ तयार केल्याचे संबंधीत नागरिकांना आढळले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली. याठिकाणी आल्यानंतर पोलिसांना सदरील युवकाचे बॅंक स्टेटमेंट व त्याचा मोबाईल सापडला आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT