Balaji Chavan
Balaji Chavan 
मराठवाडा

भोकरदनला तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

दीपक सोळंके

भोकरदन (जि. जालना) - डोईवर झालेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून भोकरदन तालुक्यातील वाडी खुर्द येथील एका तरुण शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना बुधवारी (ता. 29) सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. बालाजी ( उर्फ बाळकृष्ण) गणपत चव्हाण (35), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील वाडी खुर्द येथील बालाजी चव्हाण यांची गावालगत शेतजमीन आहे. त्यांच्या संपूर्ण कुटूंबाचा उदरनिर्वाह याच शेतीवर अवलंबून आहे. शेतीसाठी व इतर कामासाठी घेतलेले बँक कर्ज व उसनवारी सततच्या नापिकी व अतिवृष्टीमुळे वाढत गेल्याने डोईजड झालेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत बालाजी चव्हाण राहत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. याच विवंचनेतून त्यांनी बुधवारी स्वतःच्या राहत्या घरी सकाळी दोरिच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले.

या घटनेबाबत त्यांनी तात्काळ भोकरदन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली असून, वाडी खुर्द येथे दुपारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील पत्नी,एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी भोकरदन पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 Live : मुंबईच्या गोलंदाजांनी केला टिच्चून मारा; लखनौचा निम्मा संघ गारद, सामन्यात रंगत

SCROLL FOR NEXT