उमरगा (जि.उस्मानाबाद) : शहरातील राजधानी पेट्रोल पंपासमोर आयशर टेम्पो-दुचाकीचा अपघात झाला. 
मराठवाडा

उमरग्यात टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

गणेश पिटेकर

चंडकाळ येथील तीस वर्षीय तरूण माधव गणपती कांबळे हा दुचाकीवरून (एमएच १३ एवाय ७८८८) नंदगाव (ता. तुळजापूर) येथील नातेवाईकांच्या लग्नासाठी गेला होता.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : शहरातील Umarga राष्ट्रीय महामार्गावरील गुंजोटी मोड लगत असलेल्या राजधानी पेट्रोल पंपासमोर आयशर टेम्पो व दुचाकीच्या Osmanabad अपघातात तरूणाचा मृत्यु झाला. हा अपघात रविवारी (ता.२०) दुपारी दोनच्या सुमारास झाला. या बाबतची प्राप्त माहिती अशी की, तालुक्यातील चंडकाळ येथील तीस वर्षीय तरूण माधव गणपती कांबळे हा दुचाकीवरून (एमएच १३ एवाय ७८८८) नंदगाव (ता. तुळजापूर) Tuljapur येथील नातेवाईकांच्या लग्नासाठी गेला होता. लग्न सोहळा आटोपून राष्ट्रीय महामार्गावरून उमरग्याकडे असताना शहरातील गुंजोटीमोड समोरील राजधानी पेट्रोल पंपातून आयशर टेम्पो (एमएच २० बीटी ३३३७) हा पाठीमागे घेत असताना राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने माधव कांबळे हा गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी तातडीने माधव कांबळे यास उपजिल्हा रुग्णालयात Sub-District Hospital दाखल केले. मात्र त्याचा उपचारादरम्यान चारच्या सुमारास मृत्यू झाला.Youth Died In Tempo Accident In Umarga Osamanabad Accident News

सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला. दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल होऊन टेम्पो ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT