Gorakh Hajare
Gorakh Hajare sakal
मराठवाडा

Kej Crime : सतरा वर्षीय तरूणाचा टोकदार शस्त्राने वार करून खून

रामदास साबळे

केज - एका सतरा वर्षीय तरूणावर टोकदार शस्त्राने गळ्यावर वार केल्याची घटना मंगळवार (ता.२३) रोजी सायंकाळी सात-आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी करून मृत्यू झाल्याचे घोषीत केले.

या मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव गोरख महावीर हजारे (वय-१७) रा. क्रांतीनगर, केज असे आहे. खूनाच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून घटनेंतर या खूनाच्या गुन्ह्यात एका तरूणाला पोलीसांनी ताब्यात घेतले.

शहरातील क्रांतीनगर भागातील समाज मंदिर परिसरात दोन तरूणांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरूणाने गोरख हजारे या तरूणाच्या गळ्यावर टोकदार शस्त्राने वार केला. या हल्ल्याच्या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या तरूणास घटनास्थळावरून तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय तपासणी करून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील व कर्मचाऱ्यांनी रूग्णालय व घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली आहे. नातेवाईकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी हल्लेखोरास अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेऊन पोलीस ठाण्यातसमोर ठिय्या मांडला होता.

त्यानंतर थोड्याच वेळात या प्रकरणी पोलीसांनी बोबडेवाडी रस्त्यावर सनी शामराव लांडगे या हल्लेखोर तरूणास पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात रात्री उशिरा खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर मयताच्या संतप्त नातेवाईकांना हल्लेखोराचे घर पेटवून दिले होते परंतू नगरपंचायतच्या अग्निशमन दलाच्या वाहनाने आग आटोक्यात आणली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT