ashalata shinde pawar write blog for muktapeeth
ashalata shinde pawar write blog for muktapeeth 
मुक्तपीठ

खरी माणुसकी

आशालता शिंदे-पवार

विशाल सकाळी आठ वाजता मुंबईला निघाला. अकरा वाजता फोन खणखणला. फोनवरील निरोप ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. क्षणभर काही सुचेचना. त्याक्षणी तरी फोन माझ्या हातून गळूनच पडला. थोड्या वेळाने भानावर आल्यावर मी आलेल्या नंबरवर परत फोन केला. यशवंत पाटील शांतपणे मला म्हणाले, ""हो ताई, मीच तुम्हाला फोन केला होता. तुम्ही मुळीच घाबरु नका. तुमच्या मुलाला दहा वाजता अपघात झाला, परंतु पायाला फॅक्‍चरव्यतिरिक्त विशेष काही झालेले नाही. पनवेलच्या हॉस्पिटलमध्ये प्लॅस्टर करून घेतले आहे. तो पूर्ण शुद्धीवर आहे. तुम्हीही पुण्याहून येथे येण्याची तसदी घेऊ नका. संध्याकाळी मी मुंबईहून माझे काम संपवून परतताना त्याला घेऊनच येईन आणि घरी सुखरूप सोडेन.'' 

मला सांगा, रस्त्यावर अपघात झाल्यावर आपल्यापैकी किती जण थांबून जखमी झालेल्यांना उपचारासाठी मदतीचा हात पुढे करतात? आपल्यापैकी कित्येकांना वेळ नसतो. वेळ असेल तर पोलिसांच्या कटकटी नकोत म्हणून कुणीही मदतीस पुढे येत नाही. पाटील यांच्या डोळ्यांदेखत विशालच्या कारला अपघात झाला होता. त्यांनी थांबून विशालला गाडीबाहेर काढले. पोलिसांना फोन केला. पोलिसांचे सर्व सोपस्कार पार पाडून तातडीने विशालला व ड्रायव्हरला हॉस्पिटलमध्ये नेऊन सर्व उपचार करून घेतला व नंतरच पुण्याला मला फोन केला. काहीही ओळखदेखील नसताना ते विशालच्या मदतीला धावले. अन्यथा, विशाल किती वेळ रस्त्यात तसाच पडून राहिला असता व पुढे आमच्यावर काय पाहण्याचा प्रसंग आला असता, कोण जाणे? 

माझ्या दृष्टीने अशा या देव माणसाचे मोठेपण मी त्यांच्या घरी भेटायला गेल्यावरच कळले. मी त्यांना म्हटलं, ""खरंच साहेब, केवळ तुमच्यामुळेच माझा विशाल वाचला.'' तर क्षणाचाही विलंब न लावता आपल्या आईकडे बोट दाखवून म्हणाले, ""माझ्यामुळे नाही तर माझ्या आईमुळेच तुमचा मुलगा वाचला. कारण तिने केलेल्या संस्कारांमुळेच मी समाजात अशाप्रकारे वागत असतो.'' 

धन्य ती माता आणि धन्य तिच्या संस्कारशील मुलातील खरी माणुसकी ! 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT