muktapeeth
muktapeeth 
मुक्तपीठ

लाखमोलाचा आनंद

डॉ. अखिलेश राजूरकर

प्रत्येक रुग्णागणिक वेगळा अनुभव डॉक्‍टर घेत असतो. पण एखाद्याचे प्राण वाचवता आले की त्याला लाखमोलाचा आनंद होतो.

मांडवगणसारख्या ग्रामीण भागात काम करीत होतो. मांडवगणमधील प्रतिष्ठित असे एक काका कधीमधी गावात भेटायचे. बोलणे चालणे व्हायचे. काका पान खाऊ घालायचे अन्‌ मार्गस्थ व्हायचे. एके दिवशी सकाळपासून काकांना छातीत थोडा-थोडा त्रास जाणवायला लागला. त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. त्यांना घेऊन मंडळी निघाली, पण काकांना श्वास घेताना त्रास होत होता. रुग्णालयाच्या दारापर्यंत येईस्तोवर त्यांचा श्वास थांबलेला होता. हृदयाचे ठोके थांबलेले. उलटी झालेली. ही अवस्था ज्यांनी पाहिली त्यांनी काका "गेले' असे समजून रडारड सुरू केली. रुग्णालयातील मंडळींची पळापळ सुरू झालेली. तेव्हा ग्रामीण भागात कार्डियाक ऍम्ब्युलन्स लवकर मिळणे अशक्‍यप्राय असे. ऍम्ब्युलन्स 108बाबतही फारशी जनजागृती नव्हती. अशा परिस्थितीत रुग्णालयाच्या दारात रुग्ण आल्याचे दिसताच तत्काळ "इमजर्न्सी रूम'मध्ये घेतले जात असे. खरे तर काकांची परिस्थिती पाहून एखाद्या डॉक्‍टरने जागीच घोषित केले असते. पण...

पण काका गेले असा निर्णय मनाने घेतला नव्हता, प्राप्त परिस्थितीत धोका पत्करून उपचार करण्याचा निर्णय घेतला. या वेळी अतिदक्षता विभागामधील डॉ. विशाल महाजन, सौरव पाठक यांच्यासह साऱ्या कर्मचारी वर्गाने रुग्ण वाचवायचाच या जिद्दीने प्रयत्न करण्यास सुरवात केली. या वेळी सीपीआर पद्धतीचा अवलंब करत सुमारे अर्धा तास प्रयत्न केले. सीपीआर या उपचार पद्धतीत प्रयत्न केल्यास रुग्ण वाचण्याची शक्‍यता पाच टक्के असते. तेवढी शक्‍यताही प्रयत्न करण्यासाठी खूप असते. यामध्ये सात-आठ मिनिटे जरी उशीर झाला, तरी मेंदूला ऑक्‍सिजन कमी मिळून मेंदू निकामी होण्याची अन्‌ रुग्ण कोमात जाण्याची शक्‍यता असते. अशाही परिस्थितीत सीपीआर केल्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर थांबलेले हृदय सुरू झाले अन्‌ हृदयाचा पहिला ठोका ऐकू आला, तेव्हा मात्र अक्षरश: रुग्णालयातील सर्वांच्याच जीवात जीव आला. प्रचंड दडपणाखाली उपचार करून काकांची जीव वाचवला होता. या वेळी कुटुंबीयांच्या डोळ्यांतील आनंदाचे अश्रू हे लाखमोलाचा आनंद देणारे होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT