muktapeeth
muktapeeth 
मुक्तपीठ

दवाखान्यातील ज्ञान

डॉ. शरद भडभडे

दवाखाना ही माझ्या व्यवसायाची जागा होतीच, पण समाजातील सुख-दुःखाचे ज्ञान देणारेही ते स्थान होते.

माझा डफळापूर (जत)मध्ये दवाखाना होता. गुरुवारी बाजाराच्या दिवशी आसपासच्या गावांतील बरेच रुग्ण यायचे. हरिबा हताळे आला, तेव्हा त्याला धड चालताही येत नव्हते. चेहरा फिक्का पडलेला. त्याला मूतखडा झाला होता आणि तो शरीराच्या एक चतुर्थांश बाहेर येऊन अडकला होता. माझ्याकडे बाजार दिवशी यायचे म्हणून तो दोन दिवस लघवी होत नसतानाही तसाच सहन करीत होता. मला आश्‍चर्याचा धक्काच बसला. अर्धवट बाहेर आलेला खडा दिसत होता. पोट पूर्ण डांबरलेले व कडक. कॅल्शियम ऑक्‍झिलेटचा खडा, त्याला फार काटे दिसत होते. मी त्याला जवळच जतमध्ये जायला सांगितले. पण, तो काही ऐकेना. त्याला सांगितले, "मी तुला दोनशे रुपये देतो, तू जतला जाऊन शस्त्रक्रिया करून घे.'

त्याने त्यानंतर जो हिशेब सांगितला, तो ऐकून माझ्या आयुष्य जगण्याचा नूरच बदलला. तो म्हणाला, ""डॉक्‍टर, मी दिवसाचे तीन रुपये मिळवतो. माझ्या बायकोला दिवसाचे आठ आणे मिळतात. एकंदरीत महिन्याचे 105 रुपये होतात. तुमचे दोनशे रुपये द्यायलाच मला दोन-तीन महिने लागतील! आणि मी दोन महिने खाऊ काय? काय व्हायचे ते इथेच होऊ दे मला.'' मला त्याच्या या शब्दांनी बरेच काही शिकविले. मी अक्षरशः डेंटल फोरसेबने विशिष्ट प्रकारे ओढून तो खडा उचकटला. रक्ताची अक्षरशः चिळकांडी उडाली. वेगवेगळ्या औषधांचे पॅक्‍स देऊन रक्त थांबविण्यात यशस्वी झालो. त्याला ब्लॅडर रिकामे करू दिले व परत एक जाडसर असा पॅक दोन दिवसांसाठी दिला. काही पथ्ये आता त्याला दोन महिने पाळायची होती, एवढेच.
रुग्ण नंतर अगदी ठीक झाला, पण मला आसपासच्या परिस्थितीचे भान त्याने करून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT