muktapeeth
muktapeeth 
मुक्तपीठ

सावधानता हवीच!

मालती दात्ये

अपघात हे आधी सूचना देऊन होत नाहीत. पण सावधानता असेल तर होऊ घातलेला अपघात टाळता येऊ शकतो.

चाळीस वर्षांपूर्वीचा प्रसंग. माझ्या भाच्याची मुंज करायची होती. माझे घर मोठे असल्याने पुण्यात माझ्या घरात मुंज करायची ठरली. मुंजीच्या दिवशी पाच पक्वान्ने करावी लागतात. त्याप्रमाणे महिलांनी पहाटे उठून योग्य ती पक्वान्ने केली. मुंजीचा मुहूर्त साडेदहाचा होता. मुंजीच्या मुहूर्ताच्या आधी मातृभोजन म्हणून एक संस्कार असतो. त्याला संपूर्ण स्वयंपाक लागतो. नऊ वाजले तरी आचाऱ्याचा पत्ता नाही. पण नंतर आचारी आले. त्यांनी चटकन स्वयंपाक घराचा ताबा घेतला. ओट्यावरच्या वापरातील शेगड्या बाजूला ठेवल्या आणि त्यांनी आणलेली मोठी शेगडी खाली जमिनीवर घेऊन सिलिंडरला जोडली. त्यावर मोठ्या पातेल्यात स्वयंपाकासाठी आधण ठेवले. सर्व मंडळी हॉलमध्ये व्रतबंध सोहळा पाहण्यात रमलेली होती. मी, माझे यजमान आणि दोन आचारी एवढेच स्वयंपाकघरात होतो. काही वेळाने रबर जळाल्याचा वास येऊ लागला. यजमान तिथेच होते. मी म्हणाले, ""अहो, रबर जळाल्याचा वास येतोय.'' त्याबरोबर त्यांना काय वाटले परमेश्‍वर जाणे, त्यांनी सहज ती मोठी पेटवलेली शेगडी बघितली तर गॅस सिलिंडरला जोडलेली नळी पातेल्याच्या खाली पेटली होती. नळी पेटून गॅसचा स्फोट होण्यास काही क्षणाचाही अवकाश पुरला असता.

त्यांनी कुणालाही कळायच्या आत सिलिंडर चटकन बंद केला. शेगडीपासून नळी बाजूला घेतली. जळालेला भाग कापून सिलेंडरला व शेगडीला नळी पुन्हा व्यवस्थित जोडली. स्वयंपाकास सुरवात झाली आणि कार्य यथासांग पार पडले. पण नळी पेटून अजून काही क्षणांचा अवधी गेला असता तर सिलिंडरचा स्फोट व्हायला वेळ लागला नसता. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. या प्रसंगावरून एकच गोष्ट लक्षात येते, की आधुनिक तंत्रज्ञान हे शाप आहे का वरदान? त्यात हलगर्जीपणा झाला तर तो शाप आहे, पण त्याचा व्यवस्थित वापर झाला तर ते वरदानच आहे. अखंड सावधानता हवी, एवढे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT